नाशिक रुग्णालयात तोडफोड : राजेंद्र ताजणेविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:43+5:302021-05-17T04:13:43+5:30

नाशिक : नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात शनिवारी (दि. १६) कार घुसवून तोडफोड केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवक सीमा ताजणे ...

Vandalism at Nashik Hospital: Crime against Rajendra Tajne | नाशिक रुग्णालयात तोडफोड : राजेंद्र ताजणेविरोधात गुन्हा

नाशिक रुग्णालयात तोडफोड : राजेंद्र ताजणेविरोधात गुन्हा

Next

नाशिक : नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात शनिवारी (दि. १६) कार घुसवून तोडफोड केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवक सीमा ताजणे यांचा पती राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी घटनेनंतर २४ तासांचा कालावधी उलटूनही ताजणेला ताब्यात घेण्यात आलेले नाही. दरम्यान, गुन्हा दाखल होताच ताजणे फरार झाल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे याने शनिवारी सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास प्रवेशद्वाराची काच तोडून चारचाकी कार रुग्णालयात घुसवून धुडगूस घातला. तसेच गाडीतून खाली उतरल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी व परिचारिकांवर पेव्हर ब्लॉक फेकून मारला. रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाइकांनाही मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणला. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारात शिवीगाळ व दमदाटी करून दहशत पसरवली. त्यामुळे रुग्णांची व नातेवाइकांची एकच धावपळ उडाली होती.

या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल विजय सोनवणे (४७) यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कन्नू ताजणेविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासह वैद्यकीय सेवा, व्यक्ती व संस्था हिंसक कृती तसेच साथरोग सुधारणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Vandalism at Nashik Hospital: Crime against Rajendra Tajne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.