पहिल्या टप्प्यात दीड हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:01 PM2021-01-13T18:01:49+5:302021-01-13T18:02:21+5:30

सिन्नर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी दि. १६ जानेवारीपासून सुरू होणार्‍या लसीकरण मोहिमेची तालुक्यात तयारी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दीड हजारांवर आरोग्य कर्मचार्‍यांना लस टोचण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Vaccination of one and a half thousand health workers in the first phase | पहिल्या टप्प्यात दीड हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण

पहिल्या टप्प्यात दीड हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण

googlenewsNext

वैद्यकीय अधिकारी, नर्स, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा पहिल्या टप्प्यात समावेश असणार आहे. तालुक्याच्या पश्चिम, पूर्व व मध्य भागात लसीकरण केंद्र करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र निश्चितीकरण करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची तयारी सुरू आहे.

Web Title: Vaccination of one and a half thousand health workers in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.