लसीकरण मोहीम, जलप्रदूषण नियंत्रण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 06:46 PM2021-01-27T18:46:49+5:302021-01-27T18:47:26+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क मंत्रालय व जिल्हा माहिती कार्यालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम व जलप्रदूषण नियंत्रण जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

Vaccination campaign, water pollution control public awareness | लसीकरण मोहीम, जलप्रदूषण नियंत्रण जनजागृती

लसीकरण मोहीम, जलप्रदूषण नियंत्रण जनजागृती

Next
ठळक मुद्देलसीकरण मोहीम व जलप्रदूषण नियंत्रण जनजागृती

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क मंत्रालय व जिल्हा माहिती कार्यालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम व जलप्रदूषण नियंत्रण जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

आनंदतरंग फाऊंडेशनचे शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांनी कोरोना लसीकरण व जलप्रदूषण नियंत्रणावर आपल्या शाहिरी बाण्याने जनजागृती केली. लसीकरण मोहिमेवर प्रबोधन करतांना ते म्हणाले की, कोरोना सारख्या वैश्विक महामारीवर लसीकरणाला ही अनन्यसाधारण महत्त्व आहे. या जनजागृती मोहिमेस साकोरा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी उपसरपंच अतुल पाटील यांनी तर आभार ग्रामसेवक बी. बी. सरोदे यांनी मानले.

पाणी म्हणजे जीवन हे समजावून सांगत असताना ' जल नहीं तो कल नहीं, पाण्याचे स्तोत्र खराब होऊ नये. गुरं ढोर पाण्यामध्ये धुवू नये. महिला मंडळाने पाण्यामध्ये कपडे धुवून पाणी खराब करू नये. कारण ८० टक्के आजार हे पाण्यामुळे होतात. म्हणून स्वच्छ व शुद्ध पाणी असावे. या बरोबरच देवपूजेचे निर्माल्य पाण्यात न टाकता आपल्या शेतात वा परिसरात टाकावे व त्यापासून छान सेंद्रिय खत तयार होईल आणि आपली शेती बहरून येईल असा संदेश शाहीर उत्तम गायकर यांनी आपल्या शाहिरीतून दिला.
 

Web Title: Vaccination campaign, water pollution control public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.