देवळा तालुक्यातून युरीया झाला गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 06:53 PM2020-07-04T18:53:52+5:302020-07-04T18:55:09+5:30

लोहोणेर : या वर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे बळीराजा ने जुन महिन्यात मोठ्या प्रमाणावर मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन व इतर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. सध्या पाउस वेळेवर झाल्याने शेतकरी पिकांची कोळपणी, खुरपणी करण्यात मग्न आहेत. परंतु या सर्व पिकांच्या वाढी साठी नत्रयुक्त खतांची आवश्यकता असते. देवळा तालुक्यात युरीयाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी इतर तालुक्यातुन चढ्या भावाने खरेदी करताना दिसत आहेत.

Urea disappeared from Deola taluka | देवळा तालुक्यातून युरीया झाला गायब

देवळा तालुक्यातून युरीया झाला गायब

Next
ठळक मुद्देशेतकरी हैराण : तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

लोहोणेर : या वर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे बळीराजा ने जुन महिन्यात मोठ्या प्रमाणावर मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन व इतर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. सध्या पाउस वेळेवर झाल्याने शेतकरी पिकांची कोळपणी, खुरपणी करण्यात मग्न आहेत. परंतु या सर्व पिकांच्या वाढी साठी नत्रयुक्त खतांची आवश्यकता असते. देवळा तालुक्यात युरीयाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी इतर तालुक्यातुन चढ्या भावाने खरेदी करताना दिसत आहेत.

गेल्या आठ - दहा दिवसापासुन विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा, वाजगाव, खर्डे, मेशी, डोंगरगांव, महालपाटणे, वासोळ, खालप, लोहोणेर गांवात रासायनिक खतांच्या दुकानांमध्ये युरीया मिळत नसल्याने शेतकरी वैतागला असुन, देवळा तालुक्याच्या वाट्याला आलेला युरीया गेला कुठे? असा सवाल सध्या बळीराजाला पडला आहे. खेड्यातील छोटे शेतकरी दोन, तीन गोणी खरेदीकरीता तालुक्यात भाड्याचे वाहन करु न जावु शकत नाही. तालुक्यातील डीलर, खेड्यातील सबडीलर नां पाहीजे त्या प्रमाणात युरीया उपलब्ध करु न देत नाहीत. त्यामुळे सध्या तालुक्यात कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे? याबाबतीत तहसील व कृषी विभागानेही लक्ष घालण्याची गरज आहे.

 तालुक्यात युरीया उपलब्ध असल्याचे संगणिकृत आकडेवारी वरून कळते. मग शेतकऱ्यांना युरिया का मिळत नाही? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाºयांनी लक्ष घालण्याची गरज असुन गरजु शेतकºयांना आवश्यक तेवढा युरीया उपलब्ध करु न देण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपअध्यक्ष कृष्णा जाधव, दशरथ पुरकर, शशीकांत निकम, जितु पवार, बबलु निकम, योगेश पवार, संजय सावळे आदी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Urea disappeared from Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.