बिनकामी बाहेर फिरणाऱ्यांना मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:49 PM2020-03-28T22:49:20+5:302020-03-29T00:25:13+5:30

चांदोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेर रस्त्यावर बिनकामी फिरणाºयांना मज्जाव केला जात असून, जिवाची पर्वा न करता आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सेवाभावाचे कौतुक केले जात आहे.

Unrestricted for the outdoorsman | बिनकामी बाहेर फिरणाऱ्यांना मज्जाव

चांदोरी प्रवेशद्वाराजवळ येणाऱ्यांची चौकशी करताना आपत्ती व्यवस्थापन समितीचे सेवक.

Next
ठळक मुद्देव्यवस्थापन समितीचा सेवाभाव । जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस पहारा

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेर रस्त्यावर बिनकामी फिरणाºयांना मज्जाव केला जात असून, जिवाची पर्वा न करता आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सेवाभावाचे कौतुक केले जात आहे.
चांदोरी ग्रामपालिका व सायखेडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गोदाकाठ भागात चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक समिती गर्दी टाळणे व जनजागृती करत आहे. ठिकठिकाणी चौकात व चौफुली या ठिकाणी स्वयंसेवक उभे राहून बाहेरगावाहून येणाºया व्यक्तींची चौकशी करून सॅनिटायझरने हात स्वच्छ करून घेत तरच गावात प्रवेश देत आहे. मास्क लावूनच गावात प्रवेश करावा. मास्क नसेल तर रु माल बांधून गावात प्रवेश करू देत आहेत.
बिनकारण होणारी गर्दी टाळावी व कट्टे करून बसणाºयांना त्यांनी मज्जाव केला व गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. बाजार भरणाºया ठिकाणी स्वत: स्वयंसेवकांनी गावातील नागरिकांनी व्यवस्थित सेफ डेस्टिनिंग करून दिले व तसेच रेशन वाटप होत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या स्वयंसेवकांनी सुरक्षित अंतरावर उभे करून गर्दी आटोक्यात आणली. किराणा दुकाने व औषधालय या ठिकणीसुद्धा सोशल डिस्टनिंग केले. दिवसरात्र गावाच्या प्रवेशद्वारजवळ पहारा देणाºया या समाजसेवी सैनिकांना चांदोरी ग्रामपालिकेने आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समिती हे काम संपूर्ण लॉकडाउन संपेपर्यंत स्वयंस्फूर्तीने सुरू ठेवणार असल्याची माहिती अध्यक्ष सागर गडाख यांनी दिली. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी थोडाफार हातभार लागेल, असा त्यांचा मानस आहे. नेहमी नैसर्गिक आपत्तीत तसेच अपघातग्रस्तांना मदत करणे व मृतदेह शोधणे व बाहेर काढणे असे काम ही समिती करत असते; मात्र या कोरोना विषाणूपासून होणारे आपल्या समाजातील लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होऊ नये म्हणून समिती पुढे सरसावल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Unrestricted for the outdoorsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.