गावाने घडविले एकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:50 PM2019-09-10T22:50:20+5:302019-09-10T22:50:50+5:30

नांदूरवैद्य : : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये वर्षभरातील सर्व सण, उत्सव हे एकजुटीने व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात.

Unity of vision created by the village | गावाने घडविले एकीचे दर्शन

गावाने घडविले एकीचे दर्शन

Next
ठळक मुद्देस्पर्धकांना बक्षिसे तसेच मंडळाचे प्रमाणपत्र अध्यक्षांच्या हस्ते अखेरच्या दिवशी वितरित करण्यात येते.

किसन काजळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये वर्षभरातील सर्व सण, उत्सव हे एकजुटीने व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात.
नांदूरवैद्य या गावामध्ये शिवजयंती उत्सव हा ‘एक गाव, एक शिवजयंती’ या संकल्पनेनुसार अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या दोन मंडळांच्या वतीने साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव यावर्षी पहिल्यांदाच ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार एकत्र साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पहिल्याच वर्षी जय बजरंग क्रीडा मंडळ व भैरवनाथ महाराज मित्रमंडळाच्या दोन्हीही अध्यक्षांनी एकमताने ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय घेण्यात येऊन ‘एक गाव, एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार सर्व गणेश भक्तांनी नांदूरवैद्यच्या राजाची स्थापना
केली.
दहा दिवस साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा, खो-खो स्पर्धा, लिंबू चमचा, गायन, निबंध स्पर्धा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन या स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या स्पर्धकांना बक्षिसे तसेच मंडळाचे प्रमाणपत्र अध्यक्षांच्या हस्ते अखेरच्या दिवशी वितरित करण्यात येते.
या गणेशोत्सव काळात दहाही दिवस गावामध्ये प्रसादाचे वाटप केले जाते. सकाळ, संध्याकाळ वाद्यांच्या गजरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात येते. रात्रीच्या आरतीप्रसंगी लहान मुलांच्या तसेच ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी नृत्याविष्काराची जुगलबंदी तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात.
यानंतर शेवटच्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्र म सादर करण्यात येऊन सर्व ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. त्यानंतर चार वाजता संपूर्ण गावातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये गणेश मंडळाचे स्वयंसेवक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीवर लक्ष ठेवून असतात. या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चलचित्र देखावा साकारण्यात येत असल्यामुळे हा देखावा मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरते. सदर देखावा पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला गावकऱ्यांची मोठी गर्दी होत असते.
यावर्षी शिवचरित्रकार सागर महाराज दिंडे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. उत्सव आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावकºयांना निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून या  सार्वजनिक गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. यामुळेच दिवसेंदिवस सार्वजनिक मंडळांची संख्या जशी वाढत आहे तशीच सार्वजनिक गणपतींच्याही संख्येत वाढ होऊ लागली आहे.
गावातील सर्वधर्मीयांमध्ये एकोपा राहावा तसेच जातीय सलोख्याच्या माध्यमातून गावात शांतता नांदावी यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवित असल्याचे यावेळी नांदूरवैद्य येथील जय बजरंग क्रीडा मंडळ व भैरवनाथ महाराज मित्रमंडळाच्या दोन्हीही अध्यक्षांनी यावेळी सांगितले असून, या संकल्पनेचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने एकमताने स्वीकार करण्यात आला आहे. गावकरी मोठ्या आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतात.‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पने मुळे गावामध्ये शांततेचे वातावरण तयार होण्यास मदत होईल तसेच दोन्हीही मंडळांच्या गणपती उत्सवाच्या खर्चाला फाटा देत तो खर्च एकाच सार्वजनिक गणेश उत्सवासाठी खर्च केला जातो. उर्वरित रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च केली जाणार आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना या माध्यमातून शालेय साहित्य देऊन मदत करण्यात येणार आहे. यामुळे गावात सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल.
- संदीप काजळे,
अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नांदूरवैद्य

Web Title: Unity of vision created by the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.