‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेतंर्गत मुली असलेल्या पालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:57 PM2020-02-18T17:57:23+5:302020-02-18T17:58:03+5:30

सिन्नर : येथील विद्यावर्धीनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहीमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

Under the 'Beti Bachao Beti Padhava' campaign, parents of girls have been honored | ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेतंर्गत मुली असलेल्या पालकांचा सत्कार

‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेतंर्गत मुली असलेल्या पालकांचा सत्कार

googlenewsNext

सिन्नर : येथील विद्यावर्धीनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहीमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
विद्यावर्धीनीनगी येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदल्या दिवशी मंदिराच्या समोर होमहवन करून ‘श्री’च्या पादुकांचा महाभिषेक करण्यात आला. सकाळी ‘श्रीं’चे चक्री पारायण करण्यात आले.
श्रींच्या पादुकांचा पालखी सोहळा विजयनगर, खर्जेमळा, कोठूरकरमळा या मार्गे जाऊन श्रींच्या मंदिरात सोहळ्याची सांगता करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता संस्थेचे अध्यक्ष राजेश कमानकर यांच्या हस्ते गजानन महाराजांची महाआरती तर गणेशाची आरती संस्थेचे सदस्य संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अर्पण ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर फक्त मुली असणाऱ्या सुनील डावरे, विजय हिंगे, प्रविण कमानकर, राजमोहन ओझा, भास्कर कोठूरकर, सुशीलकुमार सांगळे, अरुण उगले, ऋषीकेश भसे आदी पालकांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

Web Title: Under the 'Beti Bachao Beti Padhava' campaign, parents of girls have been honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक