जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:23 AM2019-12-17T01:23:20+5:302019-12-17T01:23:42+5:30

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून, त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नो पार्किंगचा फलक लावूनसुद्धा सर्रासपणे वाहनधारक वाहने लावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 Unauthorized airport on the jogging track | जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ

जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ

Next

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून, त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नो पार्किंगचा फलक लावूनसुद्धा सर्रासपणे वाहनधारक वाहने लावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कोरड्या पाटाचा दुरुपयोग होत असल्याने सुमारे दहा वर्षांपूर्वी याठिकाणी मनपाने लाखो रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक तयार केला. साईनाथनगर चौफुली ते डीजीपीनगर क्रमांक एकपर्यंत जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. आरोग्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम असल्याने साईनाथनगर, डीजीपीनगर क्र मांक एक, विनयनगर यांसह परिसरातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक सकाळ व संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच वर्दळ असते, परंतु साईनाथनगर चौफुलीलगतच आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने याठिकाणी जिल्ह्यातून, विविध शहरातून व गावातून परीक्षेसाठी विद्यार्थी येत असतात. त्यातील बहुतेक विद्यार्थी सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकमध्येच चारचाकी आणि दुचाकी लावतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. तसेच फेरफटका मारण्यास येणाऱ्या आबालवृद्धांनाही या अनधिकृत वाहनतळाचा त्रास होत आहे. तसेच काही वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तातडीने दखल घ्यावी
साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर काही वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. जॉगिंग ट्रॅकची वाहनतळ आणि स्मोकिंग झोन म्हणून नवीन ओळख निर्माण होत चालली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

Web Title:  Unauthorized airport on the jogging track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.