उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्याने शेवग्याच्या झाडांवर फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:15 PM2021-01-28T18:15:46+5:302021-01-28T18:16:30+5:30

लोहोणेर : गेल्या दोन वर्षात लाखो रुपये खर्चूनही नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन न मिळाल्याने ठेंगोडा येथील शेवगा उत्पादक शेतकरी अनंत शेवाळे यांनी हताश होऊन एक एकर क्षेत्रावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांवर रोटर फिरवला.

Unable to produce, the farmer rotated the rotor on the sugarcane trees | उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्याने शेवग्याच्या झाडांवर फिरवला रोटर

शेवगा पिकावर रोटर फिरवताना ठेंगोडा येथील शेतकरी अनंत शेवाळे.

Next
ठळक मुद्देउत्पन्न फारच कमी प्रमाणात मिळाले.

लोहोणेर : गेल्या दोन वर्षात लाखो रुपये खर्चूनही नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन न मिळाल्याने ठेंगोडा येथील शेवगा उत्पादक शेतकरी अनंत शेवाळे यांनी हताश होऊन एक एकर क्षेत्रावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांवर रोटर फिरवला.

ठेंगोडा येथील शेतकरी अनंत नथु शेवाळे यांनी आपल्या मालकीच्या (गट नंबर १४९) शेतात गेल्या वर्षी एक एकर क्षेत्रात मोठ्या अपेक्षेने शेवग्याची लागण केली होती; मात्र वातावरणात वारंवार बदल घडून आल्याने व बेमोसमी पावसाने मनमुराद हजेरी लावली, त्यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्याने उत्पन्न फारच कमी प्रमाणात मिळाले.
मात्र यावर्षाची कसर पुढील वर्षी भरून निघेल, या अपेक्षेने या वर्षीही वातावरणात वेळोवेळी बदल घडून आला व गत महिन्यात मोठी धुक्याची लाट आल्यामुळे उत्पादन न मिळाल्याने शेवाळे यांचे दोन वर्षात सुमारे चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
                 शेवगा हा वर्षांतून दोन वेळा आर्थिक उत्पादन मिळवून देत असतो. यामुळे शेतकऱ्यांना या पीक लागवडीसाठी आस्था निर्माण झाली आहे. वर्षातून साधारण पाच ते सहा टन शेवग्याचे उत्पादन होत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (एक्स्पोर्ट) ४५ ते ९० रुपये प्रति किलो तर स्थानिक पातळीवर ६० ते ७० रुपये प्रति किलो दराने शेवग्याची विक्री होत असते.
          फेब्रुवारी महिन्यापर्यंत एक्सपोर्ट मार्केटमध्ये शेवग्याची खरेदी सुरू असते. त्यानंतर एक्सपोर्ट मार्केट बंद होते. नैसर्गिक आपत्ती व वातावरणात वेळोवेळी होणारे बदल यामुळे शेवगा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. अनंत शेवाळे यांनी वर्षाला दोन लाख रुपयांचा खर्च केला होता; मात्र उत्पादन खर्चही न निघाल्याने हताश होऊन अखेर त्यांनी एक एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या शेवगा पिकावर रोटर फिरवला. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Unable to produce, the farmer rotated the rotor on the sugarcane trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.