दोन दुचाकी समोरा समोर धकडल्याने दोनजणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:06 PM2021-06-16T13:06:17+5:302021-06-16T13:07:04+5:30

Accident : याबाबत रामदास लक्ष्मण दरोडे रा.हेदपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीसात गुन्हा दाखल

Two people were killed when two bikes collided head-on | दोन दुचाकी समोरा समोर धकडल्याने दोनजणांचा मृत्यू

दोन दुचाकी समोरा समोर धकडल्याने दोनजणांचा मृत्यू

googlenewsNext

पेठ (नाशिक)- नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ तालूक्यातील करंजाळी वनविभागाच्या रोपवाटिके जवळ दोन दुचाकींच्या समोर समोर झालेल्या धडकेत 2 ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
   
पेठ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवार दि. 15 रोजी रात्री नाशिककडून करंजाळीकडे येणारी डिस्कवरी क्र. MH-15- CX -314 व करंजाळी कडून नाशिककडे जाणारी शाईन क्रमांक MH-15-CZ-9553 यांच्यात राष्ट्रीय महामार्गावर नर्सरीजवळ झालेल्या धडकेत बाळू रामदास थाळकर वय -32 रा. हेदपाडा व युवराज मोतीराम बोंबले वय -22 रा.लिंगवणे हे दोघे मृत झाले तर सुनिल हरिदास म्हसरे हा जखमी झाला.
 याबाबत रामदास लक्ष्मण दरोडे रा.हेदपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ए.सी. जाडर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two people were killed when two bikes collided head-on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.