कामगारास लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:43 AM2019-09-16T00:43:30+5:302019-09-16T00:43:48+5:30

औद्योगिक वसाहतीतून कामावरून घरी परतणाºया कर्मचाºयाची लूटमार करणाºया दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली.

Two men arrested for robbing a worker | कामगारास लुटणाऱ्या दोघांना अटक

कामगारास लुटणाऱ्या दोघांना अटक

Next

सातपूर : औद्योगिक वसाहतीतून कामावरून घरी परतणाºया कर्मचाºयाची लूटमार करणाºया दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली.
औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची लूटमार करण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अशीच घटना शनिवारी (दि.१४) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. राजीव भूगर्भनाथ पंडित (४२) हे कामावरून घरी जात असताना त्यांना यामाहा मोटरसायकल (क्र मांक एमएच १५ बीव्ही ५१५०) वरील प्रतीक मगर (२२) आणि अनिल ताठे (२४, दोघेही राहणार कांबळेवाडी) यांनी अडवून शिवीगाळ करत पैसे व मोबाइल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न करत केला. नेमके त्याचवेळी पिटर मोबाइल आल्याने दोघा संशयितांनी पळ काढला. तर पिटर मोबाइलवरील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्या दोघांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. राजीव पंडित यांच्या फिर्यादीवरून दोघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: Two men arrested for robbing a worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.