हिसवळ येथील अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 07:07 PM2019-12-15T19:07:23+5:302019-12-15T19:07:43+5:30

नांदगांव मनमाड रोडवरील हिसवळ बु ते हिसवळ खुर्द दरम्यान गत तीन दिवसापासून अपघातांचा सिलिसला कायम आहे. रविवार (दि. १५) रोजी दुपारी साडेअकरा वाजता टेंम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील दोघेजण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे,

Two killed in accident at Hiswal | हिसवळ येथील अपघातात दोन ठार

हिसवळ येथील अपघातात दोन ठार

googlenewsNext

नांदगाव : नांदगांव मनमाड रोडवरील हिसवळ बु ते हिसवळ खुर्द दरम्यान गत तीन दिवसापासून अपघातांचा सिलिसला कायम आहे. रविवार (दि. १५) रोजी दुपारी साडेअकरा वाजता टेंम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील दोघेजण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे, मृता मध्ये माय लेकाचा समावेश आहे.
मोटार सायकल वरील जखमी व मयत हे तिघेजण नांदगांवचे रिहवासी असून त्यात झोया इकबाल खान (१०) हि बालीका व तिची आई अफसाना इकबाल खान (३०) या दोघींचा जागेवर मृत्यु झाला तर मोटार सायकल चालक इकबाल खान (३५) हे गंभीर जखमी झाले.

Web Title: Two killed in accident at Hiswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.