लाल मिरची दोनशे पार, किचन बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 05:48 PM2020-01-16T17:48:50+5:302020-01-16T17:49:15+5:30

हिरवी मिरची स्वस्त : शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

 Two hundred crosses of red pepper, the kitchen budget collapsed | लाल मिरची दोनशे पार, किचन बजेट कोलमडले

लाल मिरची दोनशे पार, किचन बजेट कोलमडले

Next
ठळक मुद्दे दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तू महागल्याने व मिरचीचीही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीतून मात्र तिखट प्रतिक्रि या

आकाश गायखे, चांदोरी : प्रत्येकाच्या रोजच्या जेवणातील लाल मिरचीचे भाव विक्र मी प्रतिकिलो २३० रुपये पार करु न गेले तर त्याच मुकाबल्यात हिरव्या मिरचीला मात्र अत्यल्प म्हणजे २० ते ३० रु पये किलोचा भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मिरचीचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यातून चांगल्याच तिखट प्रतिक्रि या उमटत आहेत.
नाशिक सह मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी नगदी आणि कमी कालावधीतील पीक असलेल्या मिरचीचे उत्पादन घेतात तर काही शेतकरी आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड करतात. यावर्षी आॅक्टोबर महिन्यात पावसाच्या लहरीपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यातच उन्हाळ्यात देखील भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने शेतक-यांच्या विहिरींची पाणी पातळी कमी झाली. त्यामुळे अनेक पिकांसह मिरचीचे उत्पादन नगण्य झाले आहे. लाल मिरची तयार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. उन्हाळा ,हिवाळा या दोन ऋतूत हिरव्या मिरच्या वाळवून त्याची लाल मिरची केली जाते. यामुळे हिरवी मिरची विकण्यावरच शेतक-यांचा भर असतो. यातच गृहिणी वर्षभराचा लाल, काळा मसाला तयार करण्याचे काम करतात. यामुळे मिरचीची मागणी जास्त आणि उतपादन कमी झाल्याने भाव वाढले आहेत. ९० ते १२० रु पये किलोने मिळणारी लाल मिरची सध्या बाजारात २२० रु पये किलोने ग्राहकांना घ्यावी लागत आहे. रोजच्या खाद्य पदार्थात मिरची घातल्याशिवाय जेवणाला गोडी येत नाही. रोचक आवश्यक असलेल्या मिरचीच्या भावात एकदमच ९० ते १०० रुपयांपर्यंतवाढ झाल्याने गृहिणींना याचा चांगलाच ठसका लागत आहे. दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तू महागल्याने व मिरचीचीही भाववाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीतून मात्र तिखट प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. लाल मिरचीचे भाव गंगनाला भिडले असतानाच हिरवी मिरचीचे भाव अल्प असून मागील १ ते २ महिन्यांपासून हिरव्या मिरचीचे भाव २० ते ३० रु पयेच असल्याने शेतकºयांचा खर्च निघणे मुश्किल झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग भांबावला आहे.

Web Title:  Two hundred crosses of red pepper, the kitchen budget collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक