मालेगाव तालुक्यात क्षयरुग्ण शोध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:05 PM2020-03-18T23:05:41+5:302020-03-18T23:06:04+5:30

मालेगाव : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मालेगाव तालुक्याते १६ ते २३ मार्च दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय २०२५ ठरविले असून, उद्दिष्ट जागतिक स्तराच्या उद्दिष्टापेक्षा ५ वर्षाने अगोदर आहे.

Tuberculosis research campaign in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात क्षयरुग्ण शोध मोहीम

मालेगाव तालुक्यात क्षयरुग्ण शोध मोहीम

Next
ठळक मुद्देजोखमीची लोकसंख्या : प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वेक्षणासाठी निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मालेगाव तालुक्याते १६ ते २३ मार्च दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय २०२५ ठरविले असून, उद्दिष्ट जागतिक स्तराच्या उद्दिष्टापेक्षा ५ वर्षाने अगोदर आहे.
काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील जोखमीची लोकसंख्या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आली आहेत. आशा, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांचे गृहभेटीतून संशयित क्षयरु ग्ण शोधणार आहेत. शोधलेल्या संशयितांची केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळीच तपासणी करून क्षयरोगाचे निदान व उपचार तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहेत. मागील काही काळापासून कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत आहे. क्षयरुग्ण खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचार घेत असतात.
केंद्र सरकारतर्फे खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांचे नोटिफिकेशन शासनाकडे करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात क्षयरुग्ण नोंदणीमध्ये अल्प वाढ झालेली आहे. क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी २०१८ मध्ये शोध मोहीम तीन टप्प्यांत राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.
या सर्व चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या मोहिमेत घरी येणाºया आशा, आरोग्य कर्मचारी यांना क्षयरुग्ण शोधण्याकामी मदत करण्याचे व माहिती देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल सावळे यांनी केले आहे.मोहिमेत १८ पथके तयार करण्यात आली असून, त्यात आशा व आरोग्य कर्मचारी असे एकत्रित ३८ सदस्य आहेत. मोहिमेत पाच पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात संशयितांची थुंकी तपासणी केली जाणार आहे. थुंकी दूषित रु ग्ण आढळल्यास त्याला तत्काळ इतर तपासणी करून औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. शैलेशकुमार निकम, तालुका आरोग्य अधिकारी, मालेगावग्रामीण रु ग्णालय दाभाडी, झोडगा व सामान्य रु ग्णालय मालेगाव येथे क्षयरोग संशयितांची मोफत एक्स-रे तपासणी केली जाते. तसेच सामान्य रु ग्णालय मालेगाव येथे सिबीनॅट तपासणी केली जाते. तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे जर संशयित क्षयरु ग्ण येत असतील तर त्यांनी शासनाला कळवून त्यांनीसुद्धा रु ग्णाची सिबीनॅट मशीनद्वारे तपासणी करावी. तालुक्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये क्षयरोगाचा औषधोपचार मोफत उपलब्ध आहे.
- विजय रा. पवार, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, पं. स. मालेगाव

Web Title: Tuberculosis research campaign in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.