भोसला मिलिटरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 04:17 PM2020-07-26T16:17:56+5:302020-07-26T16:22:04+5:30

कोरोना प्रदुभार्वाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित भोसला मिलिटीरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी युद्धातील शहिद जवानांना सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

Tribute to the martyrs on the occasion of Kargil Victory Day at Bhosla Military School in Nashik | भोसला मिलिटरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना मानवंदना

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकमध्ये कारगील विजय दिवस साजराभोसला मिलिटरी स्कूलमध्ये शहिदांना मानवंदना

नाशिक :कारगिल विजय दिनानिमित्त युद्धात शहिद झालेल्या जवानांना सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये रविवारी (दि.२६) पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली.
कोरोना प्रदुभार्वाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित भोसला मिलिटीरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेळगावकर यांच्यासह  शालेय समितीचे अध्यक्ष अतुल बेदरकर,  समादेशक ब्रिगेडियर एम.एम. मसूर (विशिष्ठ सेवा मेडल, नि.) शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. तसेच विद्यालायतील माजी सैनिकांतर्फे  शहिद स्मारकास पुष्प अर्पण करण्यात आले.  मानवदना सोहळ््यानंतर डॉ. दिलीप बेलगावकर  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कारगील विजयाच्या आठवणींना उजाळा देतानाच देशातील नागरिकांनी या वीर जवानांचे स्मरण करीत एक जबाबदार नागरिक म्हणून सदैव सजग राहत देश सेवा  करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  यावेळी हेमंत देशपांडे, शीतल देशपांडे, नितीन गर्गे,आशुतोष रहाळकर, प्रशांत नाईक, पराग रानडे, डॉ. अजित भांदक्कर, डॉ.मिलिंद पिंपरीकर, राहुल वैद्य, प्राचार्य एम. एन लोहकारे यांच्यासह सर्व शाखांचे प्रमुख उपस्थित होते.  सूत्रसंचालन जी.डी गायकवाड यांनी केले. तर एम.एन.लोहकरे यांनी  आभार मानले. 

Web Title: Tribute to the martyrs on the occasion of Kargil Victory Day at Bhosla Military School in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.