आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:56 PM2019-11-20T18:56:58+5:302019-11-20T18:57:26+5:30

सर्वतिर्थ टाकेद :आदिवासी समाजबांधवांच्या नेतृत्वाखाली येथून जवळच असलेल्या आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा आयोजित केला होता.

 Tribal culture conservation fair | आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा

  आदिवासी संस्कृती संवर्धन मेळाव्याला उपस्थित असलेले रानकवी तुकाराम धांडे, शाहीर ढवळा ढेंगळे, सोमनाथ कातडे आदीव.  

Next
ठळक मुद्दे शाहीर ढवळा ढेंगळे यांच्या भगवान बिरसा मुंडा या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. शरद टिपे व संदीप गवारी यांनी आदिवासी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आदिवासी वेशभूषा आणि सादर केलेले पारंपरिक आदिवासी नृत्य हे या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले.


सर्वतिर्थ टाकेद :आदिवासी समाजबांधवांच्या नेतृत्वाखाली येथून जवळच असलेल्या आसनगाव येथे आदिवासी संस्कृती संवर्धन मेळावा आयोजित केला होता.
आदिवासी क्र ांतिकारक क्र ांतिवीर राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून या महापुरु षांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी कवी तुकाराम धांडे तसेच सोमनाथ कातडे व शाहीर ढवळा ढेंगळे हे प्रमुख वक्ते उपस्थित होते. आदिवासी संस्कृती, आदिवासींचे हक्क व अधिकार या विषयांवर या कार्यक्र मात मार्गदर्शन करण्यात आले.सादर केलेले बोहडा, तारपा नृत्य, लेजीम, मल्लखांब, पावरी नृत्य, क्र ांतिकारक वेशभूषा हे प्रमुख आकर्षण ठरले. नाशिक जिल्ह्यासह कल्याण, ठाणे आदी परिसरातील आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते.
 

Web Title:  Tribal culture conservation fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.