देवपूर ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 08:05 PM2021-01-21T20:05:29+5:302021-01-22T00:37:54+5:30

देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर ग्रामपंचायत निवडणुकीत युवा शिवसेना नेते राजेश गडाख, पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव गडाख यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने सर्व ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

Transformation in Devpur Gram Panchayat | देवपूर ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन

देवपूर ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन

Next
ठळक मुद्देधोबीपछाड : राजेश गडाख यांच्या नेतृत्वावर विश्वास

माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. यावर्षी तीन पॅनलमध्ये लढत झाली. पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव गडाख, युवा नेते राजेश गडाख यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व ११ जागा जिंकत पंचायत समिती सदस्य विजय गडाख यांच्या ग्रामविकास पॅनल व पंचायत समितीचे माजी सदस्य नवनाथ गडाख यांच्या आपल्या पॅनलचा पराभव केला. प्रभाग क्रमांक एकमधून परिवर्तन पॅनलचे प्रशांत गडाख यांनी आपल्या पॅनलच्या भाऊसाहेब गडाख यांचा पराभव केला. याच वॉर्डातील अनुसूचित जमाती स्‍त्री राखीव जागेतून आशा बर्डे यांनी आपल्या पॅनलच्या वंदना जाधव यांचा पराभव केला. इतर मागासवर्गीय महिला जागेतून अनुराधा गडाख यांनी मावळत्या सरपंच सुनीता गडाख यांचा पराभव केला. वॉर्ड क्रमांक दोनमधून परिवर्तन पॅनलचे शरद गडाख यांनी आपल्या पॅनलच्या राजेंद्र गडाख यांचा व ग्रामविकास पॅनलचे सुखदेव गडाख, अपक्ष उमेदवार गणेश गडाख यांचा पराभव केला. महिला गटातून वनिता गडाख यांनी कविता गडाख यांचा पराभव केला, तर सुरेखा गडाख यांनी सुनंदा गडाख यांचा पराभव केला. वॉर्ड क्रमांक ३ मधून परिवर्तन पॅनलचे भालचंद्र घरटे यांनी ग्रामविकास पॅनलचे गणेश धरम यांचा पराभव केला तर महिला गटातून पुष्पा नरवडे यांनी ग्रामविकास पॅनलच्या पूजा गडाख यांना पराभूत केले. वॉर्ड क्रमांक चारमधून अनुसूचित जाती पुरुष गटातून वसंत दिवे यांनी ग्रामविकास पॅनलचे विल्यम शिंदे यांचा पराभव केला. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून राजेंद्र गडाख यांनी दौलत गडाख यांना पराभूत केले, तर सर्वसाधारण स्‍त्री राखीव गटातून वनिता गडाख यांनी रत्ना गडाख यांना पराभूत केले.

Web Title: Transformation in Devpur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.