समांतर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:34 PM2020-01-20T23:34:41+5:302020-01-21T00:14:11+5:30

समांतर रस्त्यावर तासनतास उभ्या राहणाºया भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे .

Traffic disruptions due to unpaved vehicles on parallel roads | समांतर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा

समांतर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा

Next

इंदिरानगर : भगतसिंग वसाहतलगत समांतर रस्त्यावर तासनतास उभ्या राहणाºया भंगार विक्रीसाठी घंटागाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे .
मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सुमारे दहा वर्षांपूर्वी महामार्गास दोन्ही बाजूस समांतर रस्ते तयार करण्यात आली. त्यामुळे वाहतुकीस रस्ता मोकळा होईल, असे वाटत होते. परंतु समांतर रस्त्यालगतच असलेले लहान-मोठे व्यावसायिकांमुळे वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होत आहे. समांतर रस्त्यालगतच दीपालीनगर, सूचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर यांसह विविध उपनगरे आहेत. महापालिका अतिक्र मण विभागने शहरात विविध ठिकाणी अतिक्र मण काढण्याची मोहीम उभारली आहे. परंतु त्यांना समांतर सालातच असलेली भंगार विक्र ीचे दुकाने दिसत नाही का? असा उपरोधक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.
उपनगरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी समांतर रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमात वर्दळ सुरू असते. परंतु याच समांतर रस्त्यावरून शहरातील विविध प्रभागांतून केरकचरा गोळा करून घंटागाड्या खतप्रकल्प जातात. त्यावेळी घंटागाड्यात गोळा केलेला भंगार विक्र ीसाठी समांतर रस्त्यावरच भगतसिंग वसाहतीत असलेल्या भंगार विक्र ीच्या दुकानात तासनतास घंटागाड्या उभ्या राहतात. त्यामुळे मार्गक्र मण करणाºया वाहनधारकाला तारेवरची कसरत करावी लागत असून त्यामुळे लहान-मोठे अपघातही घडतात.

Web Title: Traffic disruptions due to unpaved vehicles on parallel roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.