राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये पर्यटकांचा सेल्फी पाइंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 10:48 PM2021-07-31T22:48:40+5:302021-07-31T22:49:23+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर येथून जवळच असलेल्या निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांचा फोटो व सेल्फी पाइंट होताना दिसत आहे. राजापूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्र असून या वनविभागाच्या संवर्धन क्षेत्राच्या कमानीला येणाऱ्या जाणाऱ्या बघ्यांची निसर्ग वातावरणात भुरळ पडली. सध्या वनविभागाच्या निसर्गरम्य वातावरणात विविध क्षेत्रातील नागरिक या पर्यटन क्षेत्राकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

Tourist selfie point in the reserved forest conservation area | राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये पर्यटकांचा सेल्फी पाइंट

राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये पर्यटकांचा सेल्फी पाइंट

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटक या राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रामध्ये आकर्षित

अनिल अलगट
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर येथून जवळच असलेल्या निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांचा फोटो व सेल्फी पाइंट होताना दिसत आहे. राजापूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्र असून या वनविभागाच्या संवर्धन क्षेत्राच्या कमानीला येणाऱ्या जाणाऱ्या बघ्यांची निसर्ग वातावरणात भुरळ पडली. सध्या वनविभागाच्या निसर्गरम्य वातावरणात विविध क्षेत्रातील नागरिक या पर्यटन क्षेत्राकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

हिरवा हिरवागार गवताळ डोंगराळ भाग व या भागात हरिण-काळविटांची संख्या मोठी असून पर्यटक या राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रामध्ये आकर्षित होत असून मोबाइलमध्ये फोटो सेल्फीचा आनंद घेताना दिसत आहेत. वनविभाग नाशिक पूर्व भागात वनविभागाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभले असून या वनविभागाच्या जंगलात दगडावर हरिण, काळवीट, मोर, ससे, लांडगे, कोल्हे, तरस अशा विविध प्राण्याचे चित्र दगडावर रेखाटन केलेले असून निसर्गाच्या सान्निध्यात जिकडे-तिकडे निसर्गाने हिरवा शालू पाघरला असून राजापूर ममदापूर संवर्धन क्षेत्रामध्ये येवला नांदगाव रस्त्यावर हरिण, काळवीट यांचे चित्र लावलेली भव्य अशी कमान, रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना या ठिकाणी थांबून सेल्फी काढण्याचा मोह काही आवरला जात नाही. प्रत्येक जण येथे थांबून आनंद व्यक्त करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
या वनक्षेत्रात वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर वाघ, गोपाल हरगावकर, मोहन पवार, पोपट वाघ व वन मजूर हे या वनक्षेत्राची चांगल्या प्रकारे देखभाल करत असून या वनक्षेत्रामध्ये या कमानीजवळ चौकी बसवली आहे.

राजापूर गावापासून हाकेच्या अंतरावर ही वनसंवर्धन कमान असून या कमानीकडे पाहण्याचा व सेल्फी फोटो काढण्याचा आनंद घेतात. एका निसर्गरम्य वातावरणात पर्यटक या वनसंवर्धन क्षेत्रामध्ये असलेल्या जागेवर फोटो सेशन करत आहेत. पर्यटकांकडून या कमानीला पसंती दिली जात आहे.
येवला तालुक्यात पर्यटकांना अकाई, टकाई, देवदरी, राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्र असे नावाजलेल्या पर्यटन जागा आहेत. परंतु कोरोना महामारी असल्यामुळे या सर्व ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. पण येवला नांदगाव रस्त्यावरून प्रवास करताना वनविभागाची देखणी कमान ही एक सेल्फी पाइंट बनला आहे.

जिकडे तिकडे हिरवळ
आता सध्या आषाढ श्रावण म्हटला की जिकडे तिकडे हिरवळीने नटलेल्या डोंगरदऱ्या पर्यटक आनंद द्विगुणित करून निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी येतात व निसर्ग सानिध्यात मनाला भुरळ पडते असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. 

Web Title: Tourist selfie point in the reserved forest conservation area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.