पाझर तलावात बुडून तीन बालिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:37 PM2020-03-18T23:37:42+5:302020-03-18T23:38:43+5:30

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावाजवळील शिवाजीनगर पाझर तलावात बुडून बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तीन बालिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये बेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्या गतप्राण झाल्याने या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. या घटनेने संपुर्ण शिवाजीनगर, साप्ते शिवारात शोककळा पसरली आहे.

 Three girls drown in Pazar lake | पाझर तलावात बुडून तीन बालिकांचा मृत्यू

पाझर तलावात बुडून तीन बालिकांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देहरसूल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले.

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते गावाजवळील शिवाजीनगर पाझर तलावात बुडून बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तीन बालिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये बेंडकोळी कुटुंबातील दोन्ही चिमुकल्या गतप्राण झाल्याने या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. या घटनेने संपुर्ण शिवाजीनगर, साप्ते शिवारात शोककळा पसरली आहे.
साप्ते गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवाजीनगर पाड्यावर राहणाऱ्या सोनू बेंडकोळी यांच्या मुली जिजा सोनू बेंडकोळी (९), धनश्री सोनू बेंडकोळी (७) तसेच स्वप्साप्तेला पाझर तलावात बुडून तीन बालिकांचा मृत्यूनीली यशवंत बेंडकोळी (५) या तीघी जवळील एका पाझर तलावावर खेळताना गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत गावातीलच अंगणवाडीत शिकणारी बालिकाही होती. या तीघी पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच त्या बालिकेने गावात येऊन आई-वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेत तीन्ही चिमुकलींचे मृतदेह बाहेर काढले. हरसूल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले.

Web Title:  Three girls drown in Pazar lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.