नाशकात तीन घरफोड्या ;नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 04:14 PM2019-09-06T16:14:56+5:302019-09-06T16:16:59+5:30

नाशकात इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसात तीन घरफोड्यांच्या घटना उघड झाल्या असून शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा कोणताही वचक उरला नसल्याने शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची तक्रार नागरिकाकडून होत आहे.

Three burglaries in Nashik; | नाशकात तीन घरफोड्या ;नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत

नाशकात तीन घरफोड्या ;नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना  इंदिरानगर, मुंबईनाका, सातपूरच्या रहिवास्यांमध्ये भिती 

नाशिक : इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसात तीन घरफोड्यांच्या घटना उघड झाल्या असून शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा कोणताही वचक उरला नसल्याने शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याची तक्रार नागरिकाकडून होत आहे. 
पाथर्डीफाटा, आनंदनगर परिसरातील विक्रीकर भवनजवळील वास्तू रो हाऊसमध्ये कल्पेश अधिकराव पाटील (२९) यांच्या घरी १० आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत घरफोडी झाली. यात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ३७ हजार रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची अंगठी, ९ हजार ,रुपये किंतीचे तीन ग्रॅमचे सोन्याची कर्णफुले, १ग्रॅ्रमचा सोन्याचा मणी व दहा हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप  तपास करीत आहेत. दुसरी घरफोडी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. अशोकामार्ग परिसिरातील वाजिद मकसूद खान यांच्यासह त्यांच्या शेजारच्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात पाचशे रुपयांच्या ३० नोटा असे १५ हजार  व पाचशे रुपयांच्या शंभर नोटा असे  ५० हजार रुपये मिळून ६५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. याप्रकरणी वाजिद खान याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबईनाका परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार संजय भिसे तपास करीत आहेत. तिसरी घटना सातपूरमध्ये अमृतवाणी पाण्याच्या टाकीजवळ एमएचबी कॉलनीतील बुधवारी (दि.४) रात्री साडेबारा ते सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली. यात चोरट्यांनी प्रवीण मोहन सोन्स यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात २० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, १२ हजार रुपयांचे ब्रसलेट, १० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, दहा हजार रुपयांचा पिळदार वेढा, १० हजार रुपये किंमतीचे कर्णफुले आदि दागिन्यांचा समावेश आहे. सोन्स यांची आई फ्रान्स येथे जाणार असल्याने ते कुटुंबासह आईला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरावर हात साफ केला. अशाप्रकारे शहरातील विविध ठिकाणी बंद घरांवर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी पोलिसांसमोर घरफोड्या रोखण्याचे आव्हान निर्माण केले आहे.
नाशिक शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना 
इंदिरानगर, मुंबईनाका, सातपूरच्या रहिवास्यांमध्ये भिती 

Web Title: Three burglaries in Nashik;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.