मधूमेहमुक्त विश्वासाठी नाशिककर रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:54 PM2019-09-15T13:54:31+5:302019-09-15T14:32:59+5:30

ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणिऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नाशिककरांनी रस्त्यावर उतरून पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला.

Thousands on the streets of Nashik for the obesity, diabetes free world | मधूमेहमुक्त विश्वासाठी नाशिककर रस्त्यावर 

मधूमेहमुक्त विश्वासाठी नाशिककर रस्त्यावर 

Next
ठळक मुद्देहजारो नाशिककरांनी केला चालण्याचा व्यायाम थ्री डी वॉकेथॉनमधून लठपणा व मधूमेहमुक्तीचा संदेशडॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृतज्ञता

नाशिक : ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणिऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नाशिककरांनी रस्त्यावर उतरून पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला.

लठठ्पणा व मधुमेह मुक्तीचा संदेश विश्वभरात पोहचविण्यासाठी  या ‘थ्री डी (डॉ. दिक्षित डायट) वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. दररोज चालणे हा उत्तम व्यायाम असून शरीर निरोगी राहण्यास मदत होते तसेच विविध आजारापासून मुक्ती मिळते, त्यासाठी ‘लठ्ठपणा व मधूमेह मुक्त विश्व’ मोहीत सहभागी  होण्याचे आवाहन करीत डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी रविवार (दि. १५)इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथून वॉकेथानला झेंडा दाखवून सुरुवात केली. जॉगींग ट्रकनंतर साईनाथ नगर चौफुली,बापू बंगला, सावरकर चौक, राजे छत्रपती चौक, सार्थकनगर बस थांबामार्गे गुरुगोविंद सिंग महाविद्यालयपर्यंत हजारो नाशिककरांनी पायी चालण्याचा व्यायाम करीत वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदविला.  यावेळी नाशिककरांना मार्गदर्शन करताना मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीमेच्या माध्यमातून जगभरात भारत, अमेरिका, कोरीया, मलेशिया, सिंगापूर आॅस्ट्रेलिया आणि वेगवेगळ््या आखाती राष्ट्रांसह विविध वीस देशांमधील सुमारे १९४ शहरांमध्ये थ्री डी वॉकेथॉनच्या माध्यामतून सुमारे ५० हजारहून अधिक नागरिकांनी सुदृढ आरोग्यासाठी वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.  भारतात नाशिकसह दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, गोवा बेळगाव, औरंगाबाद, गडचिरोली,फलटण, कराडसह नांदुरा यासारख्या गाव खेड्यांच्या ठिकाणीही रविवारी (दि.१५) सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नागरिकांनी पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांनीच आपले आयुष्य नोरोगी आणि सुदृढ राखण्यासाठी वेळ दोन वेळा जेवणे आणि ४५ मिनिटांत साडेचार किलोमीटर चालण्याचा व्यायाम ही आपली जीवनशैली बनविण्याची गरज असल्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्क केली. 

सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र
थ्री डी वॉकेथॉनमध्ये सहभाही झालेल्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्रावर मागच्या बाजूला ‘लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्ती’ मोहीमेत सहभागी होण्याची प्रक्रिया विशद करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांनी आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी, मधूमेह मुक्तीसाठी  ‘लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त विश्व’ मोहीमेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी सांगितले.

Web Title: Thousands on the streets of Nashik for the obesity, diabetes free world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.