गोदावरी नदीत दूषित पाणीहजारो मासे पडले मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 03:15 PM2021-05-16T15:15:26+5:302021-05-16T15:16:10+5:30

सायखेडा : तामसवाडी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे ...

Thousands of fish fell dead in Godavari river | गोदावरी नदीत दूषित पाणीहजारो मासे पडले मृत

गोदावरी नदीत दूषित पाणीहजारो मासे पडले मृत

googlenewsNext
ठळक मुद्देकूपनलीकेद्वारे पाणी पुरवठा असणाऱ्या गावांना आरोग्याचा धोका

सायखेडा : तामसवाडी परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात दूषित पाणी आल्याने नदीच्या पात्रावर केमिकल युक्त पाण्याचा तरंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर या दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाले असून नदीच्या काठावरआल्यामुळे सर्वत्र दुर्गन्धी पसरली आहे.

गोदावरी नदीच्या काठावरून अनेक गावांना कूपनलिकेद्वारे पाईपलाईन करुन पाणी पुरवठा केला आहे. जवळपासच्या अनेक गावांना येथून पिण्यासाठी पाणी पुरविले जाते तर शेतीला सुद्धा हेच पाणी असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.
नाशिक शहरातील अनेक केमिकल युक्त औषध, कीटकनाशक कंपन्यामधून गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जाते. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील सांडपाणी याच नदीत येऊन मिळते, त्यामुळे पाणी वारंवार दूषित होते. चाटोरीपासून तर करंजगावपर्यत जवळपास वीस किलोमीटर अंतर पानवेलीने व्यापून टाकले आहे. या भागात नदी आहे की हिरवा गालीच्या हेच लक्षात येत नाही, त्यामुळे पानवेल खराब होण्याची शक्यता अधिक आहे.
केमिकल युक्त पाणी की पानवेल सडल्यामुळे पाणी दूषित झाले याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आज मात्र लाखो मासे मरण पावले, तर मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषीवर कारवाई करावी, नागरिक आणि मुके प्राणी यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे
चौकट...
तामसवाडी शिवारात गोदावरी नदीत दूषित पाणी आले असून केमिकल युक्त पाणी असल्यामुळे अनेक मासे मृत झाले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित दोषी यांच्यावर कारवाई करावी
- दत्ता आरोटे, जिल्हाध्यक्ष, प्रहार संगटना.
(१६ सायखेडा)

तामसवाडी शिवारात दूषित झालेले पाणी आणि मृत मासे.

Web Title: Thousands of fish fell dead in Godavari river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.