नांदूरवैद्य येथील गप्पांचा पारही सुनासुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:28 PM2020-03-22T22:28:01+5:302020-03-22T22:30:26+5:30

नांदूरवैद्य : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने जगभरात धुमाकूळ घातला असून, यापासून बचाव करण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूला इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला आदी ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे दररोजच भैरवनाथ मंदिराजवळील पारावर रंगणारा गप्पांचा फड रंगला नाही.

There was also a chorus of chat at Nandurvadi | नांदूरवैद्य येथील गप्पांचा पारही सुनासुना

नांदूरवैद्य येथील भैरवनाथ मंदिराजवळील ओस पडलेला पार. voro

Next
ठळक मुद्देनांदूरवैद्य परिसरातील वातावरण पहिल्यांदाच असे बदलेले.

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने जगभरात धुमाकूळ घातला असून, यापासून बचाव करण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूला इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला आदी ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे दररोजच भैरवनाथ मंदिराजवळील पारावर रंगणारा गप्पांचा फड रंगला नाही.
अनेक गावांमध्ये मंदिराजवळ किंवा एखाद्या मोकळ्याा जागी उंच अशी जागा असते. पूर्वीच्या काळी ग्रामपंचायतीचे कार्य, न्यायनिवाडा अशी कामे याच जागेवरून होत असे. असाच नांदूरवैद्य येथील भैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या या पारावर रोजच पंधरा ते वीस वृद्ध मनमोकळ्या गप्पा मारत असतात. परंतु आज जनता कर्फ्यू असल्यामुळे हा पार सुनासुना वाटत होता. कोरोनापासून वाचण्यासाठी नांदूरवैद्य येथील वृद्धांनीही पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेचे पालन केल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ व महिला यांनीदेखील प्रतिसाद देत घरातून बाहेर पडण्यास मनाई केली. नांदूरवैद्य परिसरातील वातावरण पहिल्यांदाच असे बदलेले.
परिसरात या कर्फ्यूला उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एरवी भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी रोज सकाळीच गर्दी होत असते. शाळेला सुट्टी असल्यामुळे लहान मुलांनी आजी व आजोबांकडून घरात बसून पुराणकथा, गोष्टी हट्टाने ऐकवण्यास भाग पाडले. नांदगाव बुद्रुकलादेखील दारणा धरणावर पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. परंतु जीवघेण्या कोरोना व्हायरसची साथ आल्यापासून या धरणावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.

Web Title: There was also a chorus of chat at Nandurvadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.