...तर पळता भुई थोडी होईल : संजय राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:30 AM2021-01-09T01:30:04+5:302021-01-09T01:30:45+5:30

ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी भाजपला दिली. 

... then there will be a little bit of running ground: Sanjay Raut | ...तर पळता भुई थोडी होईल : संजय राऊत 

...तर पळता भुई थोडी होईल : संजय राऊत 

Next

नाशिक : ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी भाजपला दिली. 
गिरीश महाजन यांच्यावर सुडाने कारवाई होऊ नये, या मताचे आपण आहोत, परंतु प्रताप सरनाईक, मी आम्हाला तर दहा ते पंधरा वर्षांचे जुने प्रकरण उकरून नोटीस पाठविली जात आ,हे हे त्यांनी विसरू नये. मात्र, राजकारणात दोन घ्यावे लागते दोन द्याव्याही लागतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. 
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना राऊत यांनी, भारतीय जनता पक्षाकडून संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा पुढे करण्यात येत असला, तरी औरंगाबादच्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, असा कॅबिनेटचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही. भाजपने अगोदर आपल्याच केंद्र सरकारकडे त्यासाठी आग्रह धरावा, अशी मागणी करून बिहार राज्यात औरंगाबाद जिल्हा आहे. त्याचेही नामकरण करण्यात यावे, अशी स्थानिक हिंदू धर्मीयांची मागणी आहे. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नामकरणाला ठाम विरोध दर्शविला आहे. बिहारमध्ये भाजपचे सरकार आहे, त्यामुळे बिहार व महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांनी या नामकरणासाठी आग्रह धरावा, असा टोलाही त्यांनी लगावला. 
 

Web Title: ... then there will be a little bit of running ground: Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.