ठेगोंडा बाजार पुर्वी प्रमाणे बाजार पेठेत भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:15 PM2020-10-26T15:15:14+5:302020-10-26T15:15:42+5:30

लोहोणेर  :  शासकीय नियमानुसार ठेगोंडा गावात दर मंगळवारी भरणारा आठवडे भाजीपाला बाजार दि. २७ पासून दर मंगळवारी बाजार पेठेत भरणार असुन आठवडे बाजारात येणाऱ्या सर्व व्यापारी विक्रेते, खरेदीदार व शेतकरी यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आपला माल विक्री साठी आणायला हरकत नाही.

Thegonda market will be filled in the market as before | ठेगोंडा बाजार पुर्वी प्रमाणे बाजार पेठेत भरणार

ठेगोंडा बाजार पुर्वी प्रमाणे बाजार पेठेत भरणार

Next
ठळक मुद्देसतत मोठी वर्दळ असल्यामुळे वाहतूक कोंडी

लोहोणेर  :  शासकीय नियमानुसार ठेगोंडा गावात दर मंगळवारी भरणारा आठवडे भाजीपाला बाजार दि. २७ पासून दर मंगळवारी बाजार पेठेत भरणार असुन आठवडे बाजारात येणाऱ्या सर्व व्यापारी विक्रेते, खरेदीदार व शेतकरी यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आपला माल विक्री साठी आणायला हरकत नाही. तसेच या पुढे भाजीपाला विक्रेते व इतर व्यापारी यांनी गावाबाहेर महामार्गा वरील हनुमान मंदिरा जवळ रहदारीच्या रस्त्यावर दुकान लावू नयेत. सदर रस्त्यावर लहान - मोठ्या वाहनांची सतत मोठी वर्दळ असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणीही याठिकाणी दुकान लावू नयेत. याठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याबाबत संबंधित दुकानदार जबाबदार राहील. तसेच यापुढे दुकान लावायचे असल्यास रस्ता रहदारी विभाग व ग्रामपंचायत ठेंगोडा यांचेकडील परवानगी आवश्यक आहे. त्याशिवाय दुकान लावता येणार नाही ही सर्व व्यापारी शेतकरी भाजीपाला विक्रेते यांनी नोंद घ्यावी. ठेंगोडा गावात  मंगळवारी आठवडे बाजार भरत असला तरी कोरोना अजून गेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. विक्रेत्यांनी व ग्राहकांनी मास्कचा वापर करावा. सेनिटायझरचा वापर करा. साबनाने नेहमी हात धुवा कोरोना हद्दपार करा डिस्टन्सींग ठेवा सुरक्षित अंतर ठेवून आपली काळजी घ्यावी असे आवाहन ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Thegonda market will be filled in the market as before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.