सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटना अध्यक्षपदी ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 02:56 PM2020-09-06T14:56:30+5:302020-09-06T14:57:41+5:30

सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. त्यात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Thanekar as President of Sinnar Taluka Photographers Association | सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटना अध्यक्षपदी ठाणेकर

सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शिरीष ठाणेकर तर उपाध्यक्षपदी समाधान कुर्?हाडे (शहर) व अक्षय खर्डे (ग्रामीण) यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नविनर्वाचित पदाधिकारी व सभासद.

googlenewsNext
ठळक मुद्देनिवड : उपाध्यक्षपदी अक्षय खर्डे, समाधान कुर्हाडे


सिन्नर : सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शिरीष ठाणेकर तर उपाध्यक्षपदी समाधान कुर्?हाडे (शहर) व अक्षय खर्डे (ग्रामीण) यांची निवड करण्यात आली.

सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. त्यात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, किरण मुर्तडक, संतोष गांगुर्डे तसेच सिन्नर तालुका कोअर कमिटी सदस्य अनिल काळे, नारायण आभाळे, मावळते अध्यक्ष कैलास केदार, सचिव सलीम मनियार, संपर्क प्रमुख दशरथ देसाई, कार्यवाह सुदर्शन शेलार, खिजनदार तानाजी सातपुते उपस्थित होते.
दरम्यान, उर्विरत कार्यकारिणीत सचिवपदी सचिन बोरसे, कार्याध्यक्ष समाधान चव्हाण, खिजनदार योगेश घुगे, संपर्कप्रमुख निलेश भोकनळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संजय जगताप, इक्बाल खान यांनी मार्गदर्शन केले. नूतन तसेच मावळत्या पदाधिकार्?यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवार्क काढा, अर्सेनिक अल्बम 30 व मास्कचे वाटप करण्यात आले.
योगेश घुगे यांनी सूत्रसंचालन केले. नविनर्वाचित अध्यक्ष शिरीष ठाणेकर यांनी आभार मानले. यावेळी समाधान चव्हाण, सुदर्शन अत्रे, सतीश आव्हाड, किरण भालेराव, भाऊसाहेब डावरे, गणेश तांबे, दौलत क्षीरसागर, नितीन सांगळे, भानुदास बैरागी, गणेश कडलग, सुधीर गडाख, रामहरी वारु ंगसे, राजेश जाधव, योगेश जगताप, सुरेश भिसे, शरद नागरे, रु पेश सांगळे, अजय शिंदे, बजरंग गिते, अजय शिंदे, दत्ता खताळे, केशव पवार, चेतन पगार, मिच्छंद्र सातपुते, जयराम तळपे आदी छायाचित्रकार उपिसस्थत होते.
 

Web Title: Thanekar as President of Sinnar Taluka Photographers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.