अखेर सडलेले पोल बदलण्यासाठी दहा कोटींच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:37 PM2020-02-14T19:37:57+5:302020-02-14T19:40:36+5:30

नाशिक- शहरातील जीर्ण आणि सडलेले पथदिप बदलून त्यावर एलईटी फिटींग्ज बसविण्यासाठी सुमारे दहा कोटी रूपयांच्या कामाच्या निविदा महापालिकेने मागवल्या आहेत. गेल्या महासभेत प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील सडलेल्या पोलची संख्या देऊन त्याचा देखील या प्रस्तावात समावेश करावा असे ठरले असताना देखील विद्युत विभागाने महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवून निविदा मागवल्या आहेत.

Tender Rs 10 crore for replacement of rotten poles | अखेर सडलेले पोल बदलण्यासाठी दहा कोटींच्या निविदा

अखेर सडलेले पोल बदलण्यासाठी दहा कोटींच्या निविदा

Next
ठळक मुद्देमहासभेच्या मागण्या कागदावरच भाजप गटनेता विचारणार जाब

नाशिक- शहरातील जीर्ण आणि सडलेले पथदिप बदलून त्यावर एलईटी फिटींग्ज बसविण्यासाठी सुमारे दहा कोटी रूपयांच्या कामाच्या निविदा महापालिकेने मागवल्या आहेत. गेल्या महासभेत प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील सडलेल्या पोलची संख्या देऊन त्याचा देखील या प्रस्तावात समावेश करावा असे ठरले असताना देखील विद्युत विभागाने महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवून निविदा मागवल्या आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील ९२ हजार पथदिपांवर एलईडी फिटींग्ज बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्याठिकाणी जीर्ण आणि खराब झालेले पथदिप आहेत, ते हटवून चांगले पोल असेल तर त्यावरच एलईडी फिटींग्ज बसविण्यात योणार आहे. एलईडी बसविणाऱ्या कंपनीशी तसा करार झाला आहे. त्यामुळे शहरातील जुने सडलेले पोल हटवून नवीन पोल बसविण्याच्या कामासाठी दहा कोटी रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव गेल्या महासभेत प्रशासनाने मांडला होता. त्यावर बरीच भवती न भवती झाली. एलईडी ठेकेदाराने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सडलेल्या पोल्सची संख्या निर्धारीत करण्यात आली.

त्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाच्या प्रस्तावावर शंका घेतली आणि नगरसेवकांकडून देखील संख्या घ्या आणि त्याचा प्रस्तावात समावेश करून मगच निविदा मागवा असा ठराव करण्यात आला. त्यानुसार नगरसेवकांच्या उपसूचनेसह ठराव मंजुर करण्यात आला. आणि नगरसेवकांनी आपापल्या भागातील पोल्सचे सर्वेक्षण करून त्यानुसार ती गटनेत्यांकडे सादर केली. परंतु सर्व पोल्सची आकडेवारी येण्याच्या आतच विद्युत विभागाने दहा कोटी रूपये खर्चाच्या जूनच्या प्रस्तावानुसार निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे येत्या महासभेत यासंदर्भात जाब विचारण्यात येणार असल्याचे भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी सांगितले.
 
Web Title: Tender Rs 10 crore for replacement of rotten poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.