देवळा तालुक्यात एका दिवसात नवे दहा रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:29 PM2020-07-02T20:29:44+5:302020-07-02T22:50:43+5:30

देवळा : शहर व परिसरात गुरुवारी एकाच दिवसात दहा कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील कोरोना पॉॅझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १९वर पोहोचली आहे.

Ten new rupees in one day in Deola taluka | देवळा तालुक्यात एका दिवसात नवे दहा रु ग्ण

देवळा शहरात सुभाषरोड परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आल्यानंतर नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

Next
ठळक मुद्देकोरोनाचा कहर : व्यापारी असोसिएशनतर्फे जनता कर्फ्यू

देवळा : शहर व परिसरात गुरुवारी एकाच दिवसात दहा कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील कोरोना पॉॅझिटिव्ह
रुग्णांची संख्या आता १९वर पोहोचली आहे.
आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवळा शहरात चार दिवसात १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. विविध प्रतिबंधक उपाययोजना शहरात राबविण्यात येत आहेत. तालुक्यात गुंजाळनगर येथे २, सरस्वती वाडी १, खुंटेवाडी येथे १ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देवळा शहरात ५ जुलैपर्यंत व्यापारी असोसिएशन व सर्वपक्षीयांनी जनता कर्क्यू घोषित केला आहे. ााहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंधदेवळा शहरातील वैद्यकीय व्यवसायवगळता इतर सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. कोरोनाचे रु ग्ण सापडलेला परिसर हा कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला असून, येथे बाहेरून येणाºया नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील ५० संशयित रु ग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता दहा व्यक्तींचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासन सतर्क : तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे कसोशीने पालन करावे. सर्व नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असून, प्रशासन सतर्क झाले आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांच्या सहकार्यामुळेच आतापर्यंत कोरोनाला दूर ठेवण्यात आपण यशस्वी ठरलो. कोरोनाच्या या महामारीला तोंड देण्यासाठी व शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.
- ज्योत्स्ना आहेर,
नगराध्यक्ष, देवळा

Web Title: Ten new rupees in one day in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.