तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 05:29 PM2020-02-28T17:29:25+5:302020-02-28T17:31:37+5:30

पंटवटीतील सराफ व्यावसायिक विजय बुधू बिरारी यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांची तेलंगणा पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप करीत तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह नाशिक सराफ असोसिएशनने केली आहे. 

Telangana police register case of guilty manslaughter - Photo Tiger | तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -चित्रा वाघ

तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -चित्रा वाघ

Next

नाशिक : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकरिता नाशिकला आलेले असताना या तपासादरम्यान पंटवटीतील विजय बुधू बिरारी यांचा मृत्यू आत्महत्या नसून त्यांची तेलंगणा पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप करीत तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह नाशिक सराफ असोसिएशनने संघटनेच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२८) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. 
तेलंगणा पोलिसांच्या तपास पथकाने घरफोडीतील मुख्य संशयिताने दिलेल्या कबुलीवरून पंचवटीतील सराफ व्यावसायिक पंटवटीतील विजय बुधू बिरारी  यांना चौकशीसाठी सोमवारी (दि.२४) ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.२५) पथकाच्या ताब्यात असताना बिरारी यांचा शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून कोसळून मृत्यू झाला. परंतु बिरारी यांचे लिगामेंटची शस्त्रक्रिया झालेली असून, वर्षभरापूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना व्यवस्थित चालताही येत नसताना त्यांनी विश्रामगृहाच्या उंच भीतीवरून उडी मारलीच कशी, त्याचप्रमाणे स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून शासकीय विश्रामगृहात कोणत्या कारणाने चौकशी करण्यात आली, तसेच तेलंगणा पोलिसांच्या चौकशीविषयी स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याविषयीही सराफ असोसिएशनने साशंकता व्यक्त केली असून, तेलंगणा पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी यासाठी विधीमंडळातही हा विषय उचलून धरण्यासाठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बिरारी कुटुंबीयांसोबत असहकार करणाºया पोलीस अधिकाºयांचीही चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सराफ असोसिएशनकडून देण्यात आली. यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, उपाध्यक्ष मेहुल थोरात, सचिव गिरीश नवसे, राजेंद्र दिंडोरकर, सुनील महालकर, राजेंद्र कुलथे, कृष्णा नागरे, संजय दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.  
 

Web Title: Telangana police register case of guilty manslaughter - Photo Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.