शिक्षकांची फरक देयके आठ दिवसांत खात्यावर देणार : सोळंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:28 PM2020-02-18T23:28:36+5:302020-02-19T01:00:04+5:30

नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची वैद्यकीय देयके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फरक बिले, शालार्थ आयडी मिळाल्याची फरक देयके आठ दिवसांत खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

Teachers will pay the difference in eight days on account: Solanki | शिक्षकांची फरक देयके आठ दिवसांत खात्यावर देणार : सोळंकी

शिक्षकांची फरक देयके आठ दिवसांत खात्यावर देणार : सोळंकी

Next

सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची वैद्यकीय देयके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फरक बिले, शालार्थ आयडी मिळाल्याची फरक देयके आठ दिवसांत खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.
जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त सोळंकी यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत देयकांबाबत निर्णय घेण्यात आले. शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. व्ही. बच्छाव, कक्ष अधीक्षक सुधीर पगार, प्रदीप सांगळे, बी. के. नागरे, एस. के. चकोर, परवीन शेख, शरद गिते, बाबासाहेब खरोटे, एन. वाय. पगार, मधुकर बच्छाव, एम. के. भदाणे, मनोज वाकचौरे, मच्छिंद्र सांगळे आदी उपस्थित होते.
ही सर्व देयके शिक्षणाधिकारी बच्छाव, वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांनी मंजूर करून ठेवली आहेत, पण काही तांत्रिक अडचणी असल्याने ती खात्यावर जमा होण्यास विलंब झाल्याचे सोळंकी यांनी सांगितले. मागणीनुसार कर्मचाºयांच्या खात्यावर देयके जमा करण्याच्या सूचना सोळंकी यांनी दिल्या. आयोगाचा पहिला हप्ता हा आठ दिवसांत कर्मचाºयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आयडीची प्रकरणे संपुष्टात आली असून, मूल्यांकन झालेल्या व न झालेल्या सर्व वीस टक्के अनुदानासाठीच्या शाळा फाइल आधी पाठविण्यात आल्या आहेत.
शिक्षक समायोजनाचे काम पूर्ण झाले असून, वेतनेतर अनुदान वाटप शंभर टक्के पूर्ण झाले आहे. गुणवत्तावाढीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांची तपासणी पूर्ण करून तालुक्यातून दोन उपक्र मशील शाळा निवडून त्यांचा व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही आयुक्त बच्छाव यांनी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाºयांना सांगितले.

Web Title: Teachers will pay the difference in eight days on account: Solanki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.