वनारवाडी ग्रामस्थांनी केला शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 06:36 PM2020-09-05T18:36:39+5:302020-09-05T18:37:57+5:30

जानोरी : वनारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शिक्षक गुणगौरव कार्यक्र म उत्साहात पार पडला.

The teachers of Vanarwadi honored the teachers | वनारवाडी ग्रामस्थांनी केला शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षक गुणगौरव कार्यक्र म प्रसंगी कल्पेशकुमार चव्हाण, निलेश पाटील, संतोष कथार, दत्तात्रय भेरे, बंडू भेरे, भास्कर घोलप, शरद भेरे, विलास जमदाडे, भाऊसाहेब नांदूरकर आदी.

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

जानोरी : वनारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शिक्षक गुणगौरव कार्यक्र म उत्साहात पार पडला.
प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरीचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण उपस्थि होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सत्कार करून ऋ ण व्यक्त करण्याचा वनारवाडी ग्रामस्थांचा उपक्र म स्तुत्य व आदर्शवत असून इतर गावांसाठी देखील मार्गदर्शक आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील, दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार, उपसरपंच दत्तात्रय भेरे, बंडू भेरे, भास्कर घोलप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद भेरे, ग्रामसेवक आश्विनी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी भाऊसाहेब नांदूरकर, सुनंदा घोलप, सुनंदा अहिरे, विलास जमदाडे आदींचा विशेष सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थि होते.
 

Web Title: The teachers of Vanarwadi honored the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.