पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 02:56 PM2020-08-11T14:56:09+5:302020-08-11T15:01:12+5:30

मराठा हायस्कूलच्या आवारात १० जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामाध्यमातून संयुक्तरीत्या अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक व मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवत अधिसुचना रद्द करण्याची मागणी केली.

Teachers, employees go on hunger strike to cancel notification denying pension | पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

Next
ठळक मुद्दे१० जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याची मागणीअधिसुचना रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलनमराठा हायस्कूलच्या आवारातील आंदोलनात शिक्षकांनी केले आंदोलन

नाशिक : शहरातील मराठा हायस्कूल मध्ये १०जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामाध्यमातून संयुक्तरीत्या अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. 
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक व मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने शिक्षकावर अन्यायकारक ठरणारी १०जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द  करावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाला याची जाणीव व्हावी यासाठी मराठा हायस्कूलच्या शिक्षकांनी शाळेच्या आवारात अन्नत्याग आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. १०जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे यांच्यासह मराठा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक मधुकर शिरसाठ,पर्यवेक्षक पुरुषोत्तम थोरात, रघुनाथ आहेर, अंबादास मते, सुवर्णा मुठाळ, मंगला जाधव, चित्रलेखा नाठे, कविता पाटील, विना काळे, योगेश खैरणार, सतिश पाटील, सुहास खर्डे, नितीन शिंदे, बाळासाहेब रायते, राजाराम पोटे, ज्ञानेश्वर शिंदे, सोपान वाटपाडे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Teachers, employees go on hunger strike to cancel notification denying pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.