टाटाचे तज्ज्ञ करणार उद्योगसंधींची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:18 AM2019-07-25T00:18:16+5:302019-07-25T00:18:53+5:30

भारतीय जनता पार्टीच्या नाशिक उद्योग आघाडीतर्फे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाशिकच्या औद्योगिक बलस्थानांचे सादरीकरण करण्यात आले.

 Tata expert examines industry associations | टाटाचे तज्ज्ञ करणार उद्योगसंधींची पाहणी

टाटाचे तज्ज्ञ करणार उद्योगसंधींची पाहणी

Next

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या नाशिक उद्योग आघाडीतर्फे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाशिकच्या औद्योगिक बलस्थानांचे सादरीकरण करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत टाटा यांनी उद्योगसंधीची चाचपणी करण्यासाठी महिनाभरात कंपनीतील तज्ज्ञांचे पथक नाशिकला पाठविणार असल्याचे सांगितल्याची माहिती उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली.
संरक्षण, एरोस्पेस, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, इलेक्ट्रिक चार्जिंग यंत्रणा अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीचा पर्याय तपासून घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके भेट देतील, असे आश्वासन टाटा यांनी यावेळी या उद्योग आघाडीच्या सदस्यांना दिले, असे पेशकार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत नाशिकमधील सर्व औद्योगिक संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव यांनी नमूद केले. यावेळी उत्तमराव उगले, आनंद सूर्यवंशी, युवराज वडजे, प्रमोद भगूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Tata expert examines industry associations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.