अवैधरित्या गुटखा विक्री करणारा तडीपार गुंडास ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 03:15 PM2020-06-01T15:15:48+5:302020-06-01T15:16:07+5:30

त्याच्या कब्जातून १७ हजार २४५ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tadipar gangsters beaten | अवैधरित्या गुटखा विक्री करणारा तडीपार गुंडास ठोकल्या बेड्या

अवैधरित्या गुटखा विक्री करणारा तडीपार गुंडास ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देलॉकडाउन काळात एकूण १४ हद्दपार इसमांवर कारवाई

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउन सुरू असल्यामुळे शहरातून हद्दपार करण्यात आलेले गुंड त्यांच्या राहत्या घरी येऊन राहण्याची शक्यता लक्षात घेत गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने अनंत कान्हेरे मैदानाच्या पाठीमागील झोपडपट्टीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे तपासणी करत शिताफीने चंद्रकांत भरत वाघमारे (३०) यास सापळा रचून ताब्यात घेतले. पोलीस नाइक दिलीप मोंढे यांच्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात वाघमारे यास देण्यात आले आहे. या लॉकडाउन काळात एकूण १४ हद्दपार इसमांवर महाराष्टÑ पोलीस कायदा कलम -१४४ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅनॉलरोडवरील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका किराणा दुकानचालकाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी बाळगल्याने त्यास गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. बबलु गुलामनबी शेख (२८) असे संशयिताचे नाव आहे.
अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत गुन्हे शाखेचे सहायक निरिक्षक सचिन खैरनार, उपनिरिक्षक बलराम पालकर यांच्या पथकाने सापळा रचला. बबलू हा तेथील इरफान किराणा दुकानात प्रतिबंधित हिरा पानमसाला, रॉयल-७१७ तंबाखू, राजनिवास सुगंधित पानमसाला, एन.पी.१ जाफरानी जर्दा, व्ही-१ तंबाखू, विमल पान मसाला या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करताना आढळून आला. त्याच्या कब्जातून १७ हजार २४५ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Tadipar gangsters beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.