पाडळी गावासह शाळा तंबाखुमुक्त करण्यासाठी घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:01 PM2019-12-12T18:01:54+5:302019-12-12T18:02:26+5:30

सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह शाळा परिसह तंबाखुमुक्त करण्याची शपथ घेतली. पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विदयालयात सलाम मुंबई फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत तंबाखू मुक्त अभियान राबविले जात आहे.

 Sworn in to clean school tobacco with a mad village | पाडळी गावासह शाळा तंबाखुमुक्त करण्यासाठी घेतली शपथ

पाडळी गावासह शाळा तंबाखुमुक्त करण्यासाठी घेतली शपथ

Next

विभागात गेल्या सप्ताहाभरात त्यानिमित्त विविध उपक्र म व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत सलाम मुंबई फाउंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अजय पिळणकर यांनी विद्यालायचे कौतुक केले.संस्थेचे सचिव प्रा. टी. एस. ढोली यांच्या मार्गदर्शनातून मुख्याध्यापक एस. बी.देशमुख व अभियान प्रमुख के. डी. गांगुर्डे यांनी सलाम मुंबई फाउंडेशनच्या मोबाईल अ‍ॅपवरील दिलेले अकरा निकष व व्यसन मुक्तीसाठी अधिकच्या काही उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्याची कार्यवाही केली. विद्यालयाच्या दर्शनी भागात व गावातील सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान निषेध व बंदीचे फलक व सूचना लावल्या सामुहिक शपथ घेणे, समिती गठीत करणे आरोग्य अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आयोजित करणे, बाल पंचायत भरविणे, पटनाटय सादर करणे, जनजागृती फेरी आयोजित करणे, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला व पोस्टर स्पर्धा, चित्रफीत दाखिवणे आदि उपक्र माच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करण्याचे अभिवचन दिले. यावेळी शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे उपस्थित होते.

Web Title:  Sworn in to clean school tobacco with a mad village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा