सापुतारा रस्त्यावर संशयास्पद कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:24 PM2020-09-15T22:24:16+5:302020-09-16T00:56:19+5:30

वणी : वणी सापुतारा रस्त्यावरील चौसाळे ते करंजखेड फाटा दरम्यान नाशिक येथील ईनोव्हा कार संशयास्पद स्थितीत आढळुन आली असुन गुजरात पोलीस तपास याबाबत करत आहेत. एम एच १५ ०३९० या क्र मांकाची सफेद रंगाची इनोव्हा क्रि स्टा कार वणी सापुतारा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळुन आली. वणी पोलीसांना याबाबत जागृत नागरिकांनी माहीती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असता कारमधे रक्त असल्याचे दिसुन आले.

Suspicious car on Saputara road | सापुतारा रस्त्यावर संशयास्पद कार

सापुतारा रस्त्यावर संशयास्पद कार

googlenewsNext
ठळक मुद्देवणी : गुजरात पोलीसांकडुन तपास सुरु ; इनोव्हात रक्ताचे डाग

लोकमत न्युज नेटवर्क
वणी : वणी सापुतारा रस्त्यावरील चौसाळे ते करंजखेड फाटा दरम्यान नाशिक येथील ईनोव्हा कार संशयास्पद स्थितीत आढळुन आली असुन गुजरात पोलीस तपास याबाबत करत आहेत. एम एच १५ ०३९० या क्र मांकाची सफेद रंगाची इनोव्हा क्रि स्टा कार वणी सापुतारा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळुन आली. वणी पोलीसांना याबाबत जागृत नागरिकांनी माहीती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असता कारमधे रक्त असल्याचे दिसुन आले.
सदर कार बेवारस अवस्थेत असल्याने याबाबत माहीती घेणे अडचणीचे ठरु लागले दरम्यान या कारला जीपीआरएसची सुविधा असल्याने हा गुंता सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. सदर कारचालक याला गुजरात राज्यातील वाजदा येथे नेण्यात आले व त्याच्यावर हल्ला करु न त्याला तेथेच टाकुन दिशाभुल करण्यासाठी ही कार वणी सापुतारा रस्त्यावर बेवारस सोडुन देण्यात आल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करीत आहे.
दरम्यान गुजरात राज्यातील पोलीसही घटनास्थळी पोहचले त्या कालावधीत कारचालकाचे नातेवाईक ही घटनास्थळी आले, तेव्हा रात्रीच्या सुमारास कारचालकाने काही माहीती याबाबत दिल्याची चर्चा होती. दरम्यान सोमनाथ डगळे (फस्ट ओनर) असे कारमालकाचे नाव आरटीओ अ‍ॅपवरु न मिळाले आहे, मात्र ही कार दुसऱ्या कोणाला विक्र ी केली की काय याबाबत पोलिस तपास सुरु आहे.
दरम्यान गुजरात राज्यातील वाजदा येथील घनदाट जंगलात कारचालकावर हल्ला केला ही माहीती वाजदा पोलीसांना मिळाली. त्या जखमी चालकाला वाजदा येथील रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने दुसय्ºया रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान व्हीडीओ कॉन्स्फरिंग द्वारा न्यायालयात याबाबत माहीती देण्यात येणार असल्याची माहीती गुजरात राज्यातील वाजदा येथील पोलीसांनी दिली.

Web Title: Suspicious car on Saputara road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.