ठाण्यातील गोळीबारप्रकरणी संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:43 AM2020-01-17T01:43:28+5:302020-01-17T01:44:27+5:30

ठाण्यामधील कळवा पूर्व भागातील एका मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करत झोपलेल्या युवकाला ठार मारून जबरी लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलसह काडतुसे, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सरफराज हरून अन्सारी (२६, रा. रांची, राज्य झारखंड) असे या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने नाशिकसह मालेगाव, चांदवड, चाळीसगाव रोड या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

Suspect arrested for firing in Thane | ठाण्यातील गोळीबारप्रकरणी संशयितास अटक

ठाण्यातील गोळीबारप्रकरणी संशयितास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देनिलगिरी बागेत सापळा : अट्टल गुन्हेगाराने केली होती हत्या

नाशिक : ठाण्यामधील कळवा पूर्व भागातील एका मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करत झोपलेल्या युवकाला ठार मारून जबरी लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलसह काडतुसे, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सरफराज हरून अन्सारी (२६, रा. रांची, राज्य झारखंड) असे या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने नाशिकसह मालेगाव, चांदवड, चाळीसगाव रोड या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास वीर युवराज मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटवून चोरट्याने घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र मेडिकलमध्ये प्रेमसिंग किशोरसिंग राजपुरोहित (४६) हे झोपलेले होते. शटरच्या आवाजाने प्रेमसिंग झोपेतून जागे झाले. त्यावेळी अन्सारीने प्रेमसिंगवर गोळी झाडून त्यांचा खून केला व गल्ल्यातील ८ हजार ६५० रु पये घेऊन पोबारा केला होता. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेनंतर ठाणे पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी करून संशयिताच्या शोधासाठी तपासाला गती दिली.
दरम्यान, गुन्हेगारांच्या आदानप्रदान कार्यक्र मात ठाणे पोलिसांनी संशयिताचा फोटो नाशिक पोलिसांकडे पाठविला. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात शोधमोहीम राबविली. आपल्या गोपनीय नेटवर्कद्वारे त्याची चाचपणी सुरू केली. दरम्यान, आडगाव शिवाराजवळील निलगिरी बाग झोपडपट्टीत संशयित सरफराजसोबत काही महिला फिरत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. सरफराज हा चोरी करत असून, तो अधूनमधून नाशिकला आमच्याकडे येत असल्याची कबुली या महिलांनी दिली.
पथकाने गुरु वारी (दि.१५) सरफराजला ताब्यात घेण्यासाठी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर व पोलीस हवालदार केदार यांच्या पथकाने निलगिरी बाग परिसरात सापळा रचून अटक केली. दोघा कर्मचाऱ्यांना आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस पत्रकार परिषदेत जाहीर केले.
गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे जप्त
२० हजार रु पयांची पिस्तूल, तीन काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली ३० हजार रु पयांची दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ६९० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र वापरल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असून, त्याला लवकरच ठाणे पोलिसांकडे सोपविले जाणार आहे.

Web Title: Suspect arrested for firing in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.