सहकाऱ्याकडून बक्षिसी भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:47 PM2021-07-31T18:47:10+5:302021-07-31T19:22:44+5:30

दिंडोरी : सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षिस म्हणून पाच हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पथकाने बेड्या ठोकल्या.

Surrounded by prizes from colleagues | सहकाऱ्याकडून बक्षिसी भोवली

सहकाऱ्याकडून बक्षिसी भोवली

Next
ठळक मुद्देपिंपरखेड आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

दिंडोरी : सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षिस म्हणून पाच हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पथकाने बेड्या ठोकल्या.

ही कारवाई नाशिक शहरातील मेरी लिंक रोड भागात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दामू कळसाईत असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. संशयित मुख्याध्यापक आणि तक्रारदार हे दोघेही पिंपरखेड शासकीय आश्रमशाळेत कार्यरत आहेत.
तक्रारदार यांना काही दिवसांपूर्वीच सातवा वेतन आयोगाचा फरक मिळाला. या कामासाठी मदत केल्याचा दावा करीत मुख्याध्यापक कळसाईत याने बक्षिस म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली होती.

Web Title: Surrounded by prizes from colleagues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.