आश्चर्यम...! चक्क, शीर नसलेला दुचाकीस्वार अवतरला नाशकातील रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 01:50 PM2020-09-03T13:50:19+5:302020-09-03T13:53:06+5:30

शहर वाहतुक शाखेकडून सातत्याने वर्षाच्या बारा महिने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. यामाध्यमातून लाखो ते कोट्यवधींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटत नाही.

Surprise ...! Chucky, the headless two-wheeler landed on the streets of Nashik | आश्चर्यम...! चक्क, शीर नसलेला दुचाकीस्वार अवतरला नाशकातील रस्त्यांवर

आश्चर्यम...! चक्क, शीर नसलेला दुचाकीस्वार अवतरला नाशकातील रस्त्यांवर

googlenewsNext
ठळक मुद्देशीर नसलेली व्यक्ती बघून अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा

नाशिक : वेळ अकरा वाजेची... स्थळ : द्वारका चौक.... पुणे महामार्गाच्या बाजूने अचानकपणे शीर नसलेला व्यक्ती चक्क दुचाकी चालवित येतो अन् सिग्नलवर थांबतो...यावेळी आजुबाजुला असलेल्या अन्य वाहनचालकांच्या काळजात धस्स झाले... ‘मी हेल्मेट वापरत नाही, मला डोकं नाही’ असे उपरोधिक वाक्य लिहिलेले फलक दुचाकीवर लावलेले वाचून हेल्मेट वापरासंदर्भातील शहर वाहतुक शाखेच्या एका कर्मचाऱ्याकडून केले जाणारे हे अनोखे जनप्रबोधन सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

‘हेल्मेट हैं जरुरी इसे समझो ना मजबुरी’, ‘हेल्मेट वाहतूक पोलिसांच्या भीतीपोटी नव्हे तर यमराजसोबतची भेट टाळण्यासाठी वापरा’ अशा एक ना अनेक घोषवाक्यांद्वारे हेल्मेट जनजागृती केली जाते; मात्र तरीदेखील अद्यापही काही दुचाकीस्वार हेल्मेटच्या वापराला फ ाटा देतात तर काही महाभाग हेल्मेट दुचाकीच्या आरशावर किंवा पाठीमागे लटकावून मिरवितात. शहर वाहतुक शाखेकडून सातत्याने वर्षाच्या बारा महिने हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. यामाध्यमातून लाखो ते कोट्यवधींचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा होतो; मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटत नाही, हेल्मेटधारक वाहनचालकांची संख्या अधिकाधिक वाढावी यासाठी जनप्रबोधनही तितकेच गरजेचे ठरते. नेमकी हीच बाब लक्षात घेत शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक सचिन जाधव यांनी आपल्या कल्पकबुध्दीने मिळेल त्या वेळेत साध्या ड्रेसमधून दुचाकीवरुन चक्क आपले डोके लपवून मिरवित अनोख्या जनजागृतीचा उपक्रम एकहाती राबविण्यास सुरुवात केली आहे. आगळ्यावेगळ्या पध्दतीने ड्रेसची रचना करत त्याद्वारे स्वत:चे डोके पुर्णपणे झाकून घेत आणि हेल्मेट थेट दुचाकीच्या उजव्या बाजूच्या आरशावर लावून हे महाशय शहरातील विविध रस्त्यांवरुन तसेच चौकाचौकांतून मार्गस्थ होत आहे. शीर नसलेली व्यक्ती बघून काहीसे मनोरंजन होत असले तरीदेखील अनेकांच्या पोटात भीतीचा गोळाही उठतो.

 

Web Title: Surprise ...! Chucky, the headless two-wheeler landed on the streets of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.