दहावी, बारावीची बुधवारपासून पुरवणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:36 AM2019-07-15T01:36:05+5:302019-07-15T01:37:14+5:30

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाने बुधवार (दि.१७) पासून पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यानुसार १७ ते ३० जुलैदरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

Supplementary examination from Class X, HSC till Wednesday | दहावी, बारावीची बुधवारपासून पुरवणी परीक्षा

दहावी, बारावीची बुधवारपासून पुरवणी परीक्षा

Next
ठळक मुद्देसंधी : गुणवत्ता सुधारण्यासाठी पर्याय

नाशिक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाने बुधवार (दि.१७) पासून पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यानुसार १७ ते ३० जुलैदरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनाही पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
पुरवणी परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यात नियमित अंतिम मुदत २४ जून व विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत २७ जूनला संपुष्टात आली आहे. दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत.
अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत सोमवार, दि. १ जुलै रोजी संपली, तर विशेष अतिविलंब शुल्कासह अर्जांची मुदत १२ जुलैला संपली. आता अतिविशेष अतिविलंब शुल्कासह थेट परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु त्यासाठी प्र्रतिदिन २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

Web Title: Supplementary examination from Class X, HSC till Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.