Suggestions to repair water leakage | जलवाहिन्यांची गळती दुरूस्त करण्याच्या सूचना
जलवाहिन्यांची गळती दुरूस्त करण्याच्या सूचना

सिन्नर : बारागाविपंप्रीसह सात गावे पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती असून त्याची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी गळती दुरूस्तीसह त्रुटी दूर करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना केल्या.
बारागाविपंप्रीसह सात गावे पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी आमदार वाजे बोलत होते. जीवन प्राधिकरणचे उपअभियंता आर. बी. महाजन, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, संजय सानप यांच्यासह बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, निमगाव, गुळवंच, हिवरगाव या गावांतील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
टंचाई निधीतून झालेल्या कामांची माहिती आमदार वाजे यांनी घेतली. दरम्यान, १५ जून रोजी कार्यकारी अभियंता अहिरे यांच्यासोबत योजनेबाबत पुन्हा आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. योजनेच्या मुख्य जलवाहिनीला असलेली गळती काढण्यात यावी. त्यानंतर पुरेशा क्षमतेने पाणी लाभार्थी गावांत पोहोचू शकेल. ही कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना वाजे यांनी यावेळी दिल्या.


Web Title: Suggestions to repair water leakage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.