एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:32 PM2020-04-08T15:32:13+5:302020-04-08T15:33:48+5:30

नाशिक : कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस बंद असून, उत्पन्न नसल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याचा प्रश्न निर्माण ...

st,st,the,salary,of,the,employees,of,the,corporation,was,kept | एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार रखडला

एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचा पगार रखडला

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक फटका : राज्य शासनाकडून आर्थिक मदत घेण्याचे प्रयत्न सुरू

नाशिक : कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस बंद असून, उत्पन्न नसल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी परिवहन महामंडळ राज्य शासनाकडे आर्थिक मदत मागणार असून, तशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे. कर्मचाºयांचे वेतन प्राधान्याने अदा करण्याची मागणी चालक-वाहकांकडून केली जात आहे.
अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी. महामंडळाकडे पाहिले जाते. लॉकडाउनच्या काळातही महामंडळाची अत्यावश्यक सेवा सुरूच आहे. मात्र या खात्यातील कर्मचाºयांचे वेतन रखडल्याने कर्मचाºयांना चिंता लागली आहे. एस.टी. महामंडळातील अधिकाºयांचा पगार हा महिन्याच्या १ तारखेला आणि कर्मचाºयांचा पगार हा सात तारखेला होतो. गेल्या पाच तारखेला अधिकाºयांचा पगार झाला असल्याचे बोलले जाते. आता चालक-वाहक, आगारातील कर्मचारी, अभियांत्रिकी कर्मचारी आणि अन्य कर्मचारी वर्गाचा पगार देण्यासाठी शासनाकडून मिळणाºया निधीतून प्राधान्य दिले जावे, अशी मागणी वाढली आहे.
दर महिन्याच्या २३ ते ३१ तारखेपर्यंत मिळणाºया प्रवासी उत्पन्नातून कामगारांसाठी पगाराची रक्कम राखून ठेवली जाते. परंतु यावेळी लॉकडाउनमुळे २३ ते ३१ तारखेदरम्यान बसेस बंद असल्यामुळे कर्मचाºयांच्या वेतनासाठीचा निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे सरकारकडून मिळणाºया निधीवर कर्मचाºयांचे वेतन अवलंबून आहे.

Web Title: st,st,the,salary,of,the,employees,of,the,corporation,was,kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.