नाशिकमध्येही ‘स्ट्रीट फूड हब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:30 AM2019-05-29T01:30:33+5:302019-05-29T01:31:05+5:30

महानगरपालिकेने स्मार्ट सिटी योजना राबविण्यास सुरु वात केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानेदेखील मुंबई-पुण्याच्या धर्तीवर शहरात क्लीन स्ट्रीट फूड हब प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात नाशिककरांना सर्वोत्तम अन्नपदार्थ खाण्याची मेजवानी उपलब्ध होणार आहे.

 'Street food hub' in Nashik | नाशिकमध्येही ‘स्ट्रीट फूड हब’

नाशिकमध्येही ‘स्ट्रीट फूड हब’

Next

सातपूर : महानगरपालिकेने स्मार्ट सिटी योजना राबविण्यास सुरु वात केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानेदेखील मुंबई-पुण्याच्या धर्तीवर शहरात क्लीन स्ट्रीट फूड हब प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात नाशिककरांना सर्वोत्तम अन्नपदार्थ खाण्याची मेजवानी उपलब्ध होणार आहे.
सद्यस्थितीत शहरात ठिकठिकाणी हॉटेल्स, चायनीज कॉर्नर, हातगाडे, दुकाने, चौपाटी, चौफुली आदी ठिकाणी जंकफूड, नाश्ता, जेवण, अन्नपदार्थ उपलब्ध आहेत. मात्र सर्वच ठिकाणी दर्जेदार, सकस, पौष्टिक व स्वच्छ अन्न मिळेल याची शास्वती नाही. शिवाय या ठिकाणी साफसफाई, स्वछता फारशी नसते. खाद्यतेलाचा पुनर्वापर केला जातो. खाद्यपदार्थांजवळ नाली, कचराकुंडी, सांडपाणी, घाण असे चित्र पहावयास मिळते. भांडी व इतर उपकरणे गंजरोधक धातूपासून बनविलेली नसतात. बऱ्याचवेळा पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसते. तरीही नागरिक या ठिकाणी अन्नपदार्थ खातात.
अन्न व औषध प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी सर्वेक्षण करून शहरातील तिबेटियन मार्केट, नाशिकरोड आणि सिडको या तीन ठिकाणी क्लीन स्ट्रीट फूड हब प्रकल्प (क्लष्टर) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित, स्वच्छ राहतील.
नाशिक शहरात तीन ठिकाणी हे प्रकल्प
संपूर्ण देशात क्लीन स्ट्रीट फूड हब प्रकल्प राबविण्यात येत आहे. दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, मुंबईत जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी आदी ठिकाणी हे प्रकल्प साकारलेले आहेत. राज्यात १६ ठिकाणी असे प्रकल्प राबविण्यात येत असून, नाशिक शहरात तीन ठिकाणी हे प्रकल्प प्रस्तावित आहेत. हे प्रकल्प साकारल्यास तेथे कोनशीला बसविण्यात येईल. दर तीन महिन्यांत आॅडिट केले जाईल. असेही अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त साळुंखे यांनी सांगितले.

Web Title:  'Street food hub' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.