ग्रामीण भागातील वीज उपकेंद्रांना वादळाचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:53+5:302021-05-19T04:15:53+5:30

ग्रामीण दुर्गम भागातील सुरगाणा उपविभागातील बोरगाव, सुरगाणा आणि उंबरठाण येथील तीन विद्युत उपकेंद्र आणि पेठ उपविभागातील ...

Storm 'shock' to power substations in rural areas | ग्रामीण भागातील वीज उपकेंद्रांना वादळाचा ‘शॉक’

ग्रामीण भागातील वीज उपकेंद्रांना वादळाचा ‘शॉक’

Next

ग्रामीण दुर्गम भागातील सुरगाणा उपविभागातील बोरगाव, सुरगाणा आणि उंबरठाण येथील तीन विद्युत उपकेंद्र आणि पेठ उपविभागातील उंबराळे,पेठ, ननाशी आणि करंजाळी या चार विद्युत उपकेंद्रांना जोडणाऱ्या ३३ केव्ही वाहिनीवर तांत्रिक बिघाड होऊन सोमवारपासून केंद्रे बंद पडली आहेत. मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे डोंगरघाटात असलेल्या या वाहिन्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास विलंब होत आहे.

१७ मे २०२१ रोजी तौक्ते चक्रीवादळाच्या परिणामामुळे १३२ केव्ही दिंडोरी या उपकेंद्रातून जाणारी ३३केव्ही सुरगाणा वाहिनी जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे आणि मुसळधार पावसामुळे ३३केव्ही सुरगाणा वाहिनीवर बिघाड होऊन बंद पडली. या वाहिनीची एकूण लांबी दिंडोरीपासून ९८ किलोमीटर आहे. त्यामुळे बोरगाव, सुरगाणा आणि उंबरठाण हे तीनही विद्युत उपकेंद्रे बाधित झाली. सोमवारी संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसानंतर सुरगाणा व उंबरठाण उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला. वादळीवाऱ्यामुळे उपकेंद्रे सातत्याने बंद पडत आहेत. उपकेंद्र वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे कामगार यांच्यासह जवळपास ५० जण मु युद्धपातळीवर काम करीत आहेत.

नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली आणि कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांनी प्रत्यक्ष सुरगाण्यात घटनास्थळी भेट देऊन यंत्रणांची पाहणी केली आहे.

Web Title: Storm 'shock' to power substations in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.