प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:46 PM2020-09-04T22:46:48+5:302020-09-05T01:04:31+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

Statement of Primary Teachers Association | प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदन देताना जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सदस्य. समवेत बाळासाहेब क्षीरसागर, राजीव म्हसकर, अंबादास वाजे व इतर पदाधिकारी.

Next

सायखेडा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
प्रलंबित असलेले मुख्याध्यापक पदोन्नती, निवड श्रेणी, वैद्यकीय बिल, प्राथमिक शिक्षकांचा १ तारखेला होणारा पगार अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी इगतपुरी तालुक्यातील आंब्याची वाडी शाळेतील शिक्षक कैलास सूर्यवंशी यांनी शालेय पोषण आहार तसेच सुवर्णमहोत्सवी योजनेच्या संदर्भाने दोन अ‍ॅप तयार केले आहेत. त्याचे अनावरण अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, प्रदीप शिंदे, मिलिंद गांगुर्डे, प्रमोदजी शिरसाठ, जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार, कार्याध्यक्ष अर्जुन ताकाटे, विनायक ठोंबरे, बाजीराव सोनवणे, प्रदीप पेखळे, निवृत्ती नाठे, उमेश बैरागी, किरण सोनवणे, संतोष मेमाणे, सुरेश धारराव, सुभाष भदाणे, अरुण सोनवणे, प्रमोद क्षीरसागर उपस्थित होते.

Web Title: Statement of Primary Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.