उड्डाणपुलासंबंधी खासदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 09:14 PM2021-01-25T21:14:21+5:302021-01-26T02:20:02+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असून पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केल्याने वाहनधारकांना मोठा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यासंदर्भात वाहनधारकांनी खासदार डॉ. भारती पवार यांना निवेदन देत मार्ग सुरू करण्याची मागणी केली.

Statement to MPs regarding flyover | उड्डाणपुलासंबंधी खासदारांना निवेदन

खासदार भारती पवार यांना उड्डाणपुलावरील मार्गासंदर्भात निवेदन देताना नागरिक.

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत हि मोठी बाजार पेठ असल्याने मोठी वर्दळ असते.

पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असून पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केल्याने वाहनधारकांना मोठा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यासंदर्भात वाहनधारकांनी खासदार डॉ. भारती पवार यांना निवेदन देत मार्ग सुरू करण्याची मागणी केली.

पिंपळगाव बसवंत हि मोठी बाजार पेठ असल्याने मोठी वर्दळ असते. या उडडाणपुलामुळे चिंचखेड चौफुलीवरील वाहतुक कोंडी कमी झाली असली तरी चढण्या-उतरण्याचे मार्ग बंद केल्याने अडचणीत भर पडत तीन किलोमीटर हेलपाटा मारावा लागत आहे. या बाबतीत खासदार भारती पवार यांना स्वतःच त्याचा अनुभव आल्याने त्यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरले व लवकरात लवकर सदरचे रस्ते मोकळे करून देण्याच्या सुचना केल्या. दरम्यान, पर्याया रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी बापू पाटील. सतीश मोरे, अल्पेश पारख, चिंधू काळे, शूतल बुरकुले, गोविंद कुशारे, प्रशांत घोडके आदींसह नागरिक उपस्थित होते.
 
Web Title: Statement to MPs regarding flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.