आदिवासी सहकारी संस्था कर्मचाऱ्यांचे मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:31 PM2021-07-08T22:31:30+5:302021-07-09T00:34:22+5:30

सुरगाणा : नाशिक जिल्हा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे कर्मचारी गटसचिव यांनी असहकार व कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन सहायक निबंधक बाळकृष्ण मवाळ यांना देण्यात आले आहे.

Statement of demands of tribal co-operative society employees | आदिवासी सहकारी संस्था कर्मचाऱ्यांचे मागण्यांचे निवेदन

सहायक निबंधक बाळकृष्ण मवाळ यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : विमा संरक्षणाची मागणी

सुरगाणा : नाशिक जिल्हा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे कर्मचारी गटसचिव यांनी असहकार व कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन सहायक निबंधक बाळकृष्ण मवाळ यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव व कर्मचारी यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आदिवासी भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता संस्थेमार्फत होणारे कर्जवाटप पूर्णपणे थांबले आहे. आदिवासी संस्थेच्या सचिवांना कोविड १९ मध्ये विमा संरक्षण मिळावे, संस्था सचिव व कर्मचारी यांना आदिवासी विकास महामंडळात कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, अनिष्ट तफावतीमधील संस्थांना कर्जवाटप करण्यात यावे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या केडरला पगाराकरिता कर्जवाटपावर एक टक्का याप्रमाणे निधी मिळतो तसाच निधी आदिवासी संस्थेला देण्यात यावा. सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी दिलेल्या पत्राची तत्काळ अंमलबजावणी करावी, यासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
निवेदनावर अध्यक्ष एकनाथ गुंड, उपाध्यक्ष बाळासाहेब चंद्रमोरे, सरचिटणीस संदीप फुगे, तर गावनिहाय गटसचिव भरत पवार, मनोहर जाधव, योगेश गांवडे, मनोहर पवार, सोमनाथ राठोड, नारायण वार्डे, शांताराम गवळी, सुभाष ठाकरे, शंकर गाढवे, केशव भोये, जयवंत चौधरी, पंढरीनाथ कामडी, लक्ष्मण गायकवाड, आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

 

Web Title: Statement of demands of tribal co-operative society employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.