मजुर उपलब्ध झाल्यामुळे बंद कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 01:35 PM2020-07-07T13:35:48+5:302020-07-07T13:36:10+5:30

देवळा : शहरात जनता कर्फ्यू सद्या बंद असलेल्या कोलती नदीपात्रातील बाजार तळावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे, तसेच पाच कंदील चौक सुशोभिकरणाचे काम मजूर उपलब्ध झाल्यानंतर सुरू झाल्यामुळे स्वच्छ व सुंदर देवळा या संकल्पपूर्तीकडे शहराची वाटचाल सुरू झाली आहे.

Start of closed works due to availability of labor | मजुर उपलब्ध झाल्यामुळे बंद कामांना प्रारंभ

मजुर उपलब्ध झाल्यामुळे बंद कामांना प्रारंभ

googlenewsNext

देवळा : शहरात जनता कर्फ्यू सद्या बंद असलेल्या कोलती नदीपात्रातील बाजार तळावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे, तसेच पाच कंदील चौक सुशोभिकरणाचे काम मजूर उपलब्ध झाल्यानंतर सुरू झाल्यामुळे स्वच्छ व सुंदर देवळा या संकल्पपूर्तीकडे शहराची वाटचाल सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वत्र मजुरटंचाई निर्माण झाली होती. याचा परिणाम शहरात सुरू असलेली विकासकामे ठप्प होण्यात झाला होता. पाच कंदील चौक सुशोभीकरण, बाजार तळ, देवळा इंदीरानगर रस्ता डांबरीकरण आदी कामे मजुरांअभावी खोळंबले होते. नगरपंचायतीने ही प्रलंबित कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मजुरटंचाईमुळे ते अशक्य झाले होते. अखेर मजुर उपलब्ध झाल्यानंतर शहरातील विकास कामांना चालना मिळाली असून शहरातील पाच कंदिल चौक परीसर सुशोभिकरण तसेच बाजारपट्टीत पेव्हर ब्लॉक व इतर सुविधांचे कामे सुरू झाले आहे.
---------------------
कोरोनामुळे देवळा शहरात दर रविवारी कोलतीनदी पात्रात नियमित भरणारा आठवडे बाजार मार्च महिन्यापासून बंद आहे. रविवार सोडून इतर दिवशी कोलती नदीपात्रात भाजीपाला विक्र ेत्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याच्या अटीवर नगरपंचायतीने भाजीपाला विक्रि स मर्यादीत कालावधीसाठी परवानगी दिलेली आहे. यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. परंतु शहरात आठवडाभरातच कोरोनाचे १५ रूग्ण सापडल्यामुळे १३ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. यामुळे व्यापारी पेठा, छोटेमोठे व्यवसाय, भाजीपाला मंडई बंद आहे.

Web Title: Start of closed works due to availability of labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक