संत निरंकारी समागमसाठी घोटीत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:09 PM2020-01-19T22:09:56+5:302020-01-20T00:17:49+5:30

नाशिक येथील म्हसरूळजवळील बोरगड येथे पावणेचारशे एकर जागेत सद्गुरु सुदीक्षा माताजींच्या उपस्थितीत दि. २४ ते २६ जानेवारीदरम्यान संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, घोटी शाखेच्या वतीने बसस्थानक ते रामरावनगरपर्यंत रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

Staged rally for saintly selfless sex | संत निरंकारी समागमसाठी घोटीत रॅली

घोटी शहरातून काढण्यात आलेली संत निरंकारी मंडळाची रॅली.

googlenewsNext
ठळक मुद्देघोटी शाखा : बोरगड येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सर्वतीर्थ टाकेद : नाशिक येथील म्हसरूळजवळील बोरगड येथे पावणेचारशे एकर जागेत सद्गुरु सुदीक्षा माताजींच्या उपस्थितीत दि. २४ ते २६ जानेवारीदरम्यान संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, घोटी शाखेच्या वतीने बसस्थानक ते रामरावनगरपर्यंत रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
रॅलीत गावोगावच्या संत व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यापूर्वी मुंबई येथे संत समागम होत असे. परंतु दिवसेंदिवस लाखोंची गर्दी वाढत चालल्याने चुनाभट्टी (चेंबूर), कळवा (ठाणे), खारघर (नवी मुंबई) येथील जागा कमी पडल्याने हा कार्यक्रम नाशिक येथे घेण्यात येणार आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी, इगतपुरी व शिरेवाडी या तीन शाखांपैकी घोटी शाखेतील मोगरेचे प्रबंधक दत्तू नाडेकर, खडकवाडीचे गुलाब कडू, घोटीचे शिवाजी बारगजे, सोमजचे कृष्णा कुंदे, गरुडेश्वरचे तानाजी वारघडे, वैतरणाचे वाळू पारधी, गांगडवाडीचे सोनू गांगड, उभाडेवाडीचे गोरख गांगड, उभाडेचे किसन उंबरे, उंबरकोणचे सुकदेव सारूक्ते, बळवंतवाडीचे लक्ष्मण लोटे, भरवजचे शशिकांत मेमाणे, दरेवाडीचे बाळू गावंडा, काळुस्तेचे शिवराम घारे, खैरगावचे सोमनाथ फोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व दिलीप तोकडे, माजी उपसरपंच संतोष दगडे, राजू लंगडे, गजानन दुरगुड, ज्ञानेश्वर कडू व शिवमल्हार मित्रमंडळ यांच्या सहकार्याने रॅली काढण्यात आली. पारंपरिक पोशाख परिधान केलेले बालसंत न्यू इंग्लिश स्कूल काळुस्तेचे लेजीम पथक लक्षवेधी ठरले. यावेळी सुधाकर दुरगुडे, पंडित डहाळे, राम भटाटे, दशरथ उंबरे उपस्थित होते.

Web Title: Staged rally for saintly selfless sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.